पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने 33 काही छन्दोविषयक प्रश्न परन्तु संस्कृत कवींनी जातिरचना अवगत करून घेतली नाही आणि तिची वाढहि केली नाही. अिन्द्रवज्रा नि झुपेन्द्रवज्रा यांच्यातील भेद प्रथमाक्षरापुरताच असल्यामुळे छन्दांत फारसें अन्तरन पडतां, रचनेंत थोडी विविधता आणतां येञ्थून कवीस तेवढी मोकळीक मिळते म्हणून अिन्द्रवज्रानि श्रुष्पेन्द्रवज्रा यांचें स्वैर मिश्रण आलें. हें मिश्रण समाक्षरक वृतांचें, वर्गबान्धवांचें असावें त्याप्रमाणे तें अिन्द्रवंशा-वंशस्थ, शालिनी-वातोर्मि, असें होॐ शकतें. परन्तु अिन्द्रवंशा-वंशस्थांचें मिश्रणसुद्धा, भागवत वगळल्यास अितरत्र फारच दुर्मिळ आहे. दोन भिन्न वृतांचें मिश्रण ( १) कक-खख वा (२) कखखक वा ( ३) कखकख वा (४) कककख असें विविध प्रकारचें होॐ शकेल, तिसरा प्रकार अर्धसमवृत्ताचा असल्याने त्यांत तरी मिश्रवृत्तांची वाढ व्हायला हवी होती. शिशुपालवधाचा १२ वा सर्ग हा अिन्द्रवंशा-वंशस्थ मिळून होणा-या 'शिशिरा' या अर्धसमवृत्तांत आहे पण त्याचेंहि अनुकरण झालें नाही. ओकन्दरीने पाहतां मिश्रण हें संस्कृत कवींना रुचलें नाही असें दिसतें. रामरक्षास्तोत्रांत शार्दूलविक्रीडित आणि स्रग्धरा या वृत्तांचें पहिल्या प्रकारचें मिश्रण आहे:- ‘ रामं लक्ष्मणपूर्वज रघुवरं सीतापर्ति सुन्दरं वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलक राघवं रावणारिम् ।” ही गोष्ट कोणी' तिकडे लक्ष्य वेधीपर्यन्त, रामरक्षेचें दैनन्दिन पठन होञ्भूनहि ध्यानांत येत नाही अितकें हें मिश्रण सम्यकू आहे. पिङ्गलाने शिखा म्हणून जेी प्रकार साङ्गितला आहे त्यांत अचलधृति आणि विद्युन्माला यांचें असेंच मिश्रण आहे. पहिले दोन चरण अचलधृतीचे आणि शेवटले दोन विद्युन्मालाचे असल्यास पद्यास ज्योति (पि ४५०) म्हणतात; आणि झुलट क्रम असल्यास पद्यास सौम्या (पि ४॥५१) म्हणतात. याचप्रमाणे जातिरचनेंत हरिभगिनी आणि साकी यांचें मिश्रण शङ्कराचार्यकृत लक्ष्मीनृसिंहपञ्चरत्नम् या स्तोत्रांत आहे. १ पण्डित केदारनाथ (हपि १११ टीप).
पान:छन्दोरचना.djvu/50
Appearance