Jump to content

पान:छन्दोरचना.djvu/34

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने VS काही छन्दोविषयक प्रश्न ललितलेखनकारांच्या प्रकृतीला मानवतें असें नाही. पद्यामुळे कित्येकांची कुचम्बणा होते. पद्य हें लीलेने रचितां येत असलें तरी त्यामुळे कित्येकांची सुारख्याच लीलेने रचू शकतात; पण त्यांच्या गद्यांत जसा भावनेचा विकास आणि कल्पनेचा विलास आढळतो तसा तो त्यांच्या पद्यांत दिसत नाही. ६ छन्दोज्ञान काव्यप्रेरक नाही, पण काव्यशोधक आहे. केवळ लगक्रमनिदर्शक चित्र डोळ्यांपुढे ठेथून सरस पद्यरचना करिता येअील काय ? नाही. रचनाचित्राच्या साहाय्याने ओखाद्या अपरिचित वृत्तांत कविता लिहावय चें कवीच्या मनांत आलें तर प्रथम त्याला त्या चित्राप्रमाणे निरर्थक का होअीना पण लघुगुरु ध्वनि गुणगुणून त्या पद्याला काहीतरी चाल लाविली पाहिजे. चाल अमुकच असली पाहिजे असें नाही; परन्तु कोणती तरी चाल मनांत बाणल्यावाचून सुसम्बद्ध पद्यरचना होॠच शकत नाही असा अनुभव आहे. झुलटपक्षीं स्थूलमानाने ओखादी चाल मनांत बाणली असूनहि पद्यरचनेकडे मूळचीच थोडीफार प्रवृत्ति असल्याविना पद्यनिर्मिति होॠ शकत नाही. चाल प्रत्यक्ष औकायला मिळून अवगत झाली आणि स्वाभाविक प्रवृत्तीहि पद्यरचनेकडे असली तरी तेवढ्याने कार्यसिद्धि होत नाही. पद्यरचना होअील; पण अक्षरांचें मात्रामापन जर रेखीवपणाने ध्यानांत राहिलें नसेल आणि ताडून पहायला लगक्रमाचें चित्र जर डोळ्यापुढे नसेल तर झालेली पद्यरचना छन्दःशुद्ध असेलच असें निश्चयाने साङ्गतां येणार नाही. ओखादी कविता कवीला आपल्या मधुरस्वरांत म्हणून दाखवितां येते: आणि ती औकून श्रोते प्रमुदित होतात ओवढ्याने त्या कवितेची छन्दःशुद्धता सिद्ध होत नाही. गोड स्वराने आपली कविता म्हणून दाखविणा-या कवीची रचना शिथिलच असण्याचा सम्भव असतो हें आश्चर्यकारक वाटलें तरी दुर्दै कोठे व्हस्व स्वर लाम्बवून दीर्घ करील; प्रसङ्गविशेषीं दोन तीन अक्षरें न्यूनकालांत दुप्त झुचारील तर केव्हा अक्षरांची झुणीव तो निरर्थक स्वर लाम्बवून