पान:छन्दोरचना.djvu/33

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना कला असल्याकारणाने भावार्थाचें मनांत संरक्षण करणारी' आणि भावना झुक्तेजित करण्यास साह्य करणारी ओक आनन्ददायक गोष्ट म्हणून पद्य हैं काव्याशी संलम व्हावें; तें काव्याचें शरीर व्हावें हें योग्यच होय. ५ पद्यरचनेची कृत्रिमता पद्यरचना ही मुळीच कृत्रिम नाही असें मात्र नाही. *तुजविण गमे वृथा संसार ” वा * लोळत कच मुखविधुवर । त्यांसि तोंचि. कर निवारि” अशा सारख्या पद्यांचे आरम्भ सहजस्फुरित असू शकतात. तथापि या झुदाहरणांमध्ये सुद्धा तुजविण, गमे, मुखविधु, कर हे दैनिकबोलीच्या बाहेरील शब्द आहेत आणि वरि, तेंचि आणि निवारि हीं दैनिकबोलीबाहेरील रूपें आहेत. या गोष्टी कृत्रिमतेचीच छटा दाखवितात. मग ओकाच ठराविक आन्दोलनाच्या साच्याची सारी दीर्घ कविता प्रतिज्ञापूर्वक रचण्यांत किती कृत्रिमता येत असेल! पद्यरचना अगदी स्वाभाविक आणि सुकर नाही म्हणूनच कवीला अपरिचित शब्द वा रूपें:योजण्याची नि प्रसङ्गविशेषीं व्याकरणाच्या नियमांचें झुलङ्घन करण्याची मोकळीक असते. ही मोकळीक अल्पतम घेण्यांत आणि कृत्रिमता दिसू न देण्यांतच कवीचें कौशल्य प्रगट होतें. अभ्यासाने ज्याप्रमाणे व्याकरणशुद्ध रचना करणें स्वाभाविक होतें त्याचप्रमाणे छन्दोबन्धन हें कवीच्या मनवळणीं पडून गेलें की त्याची भाषा आपोआप छन्दोबद्ध नि छन्दःशुद्ध अशी येते. तिच्यांतील कृत्रिमता पार दृष्टी आड होते. निसर्गाचा आभास म्हणजेच कलेचा विलास होय. पद्याच्या ज्या नियमित आन्दोलनामुळे वाचकाला ओक प्रकारची जागृत तन्द्रा लागून त्या तन्द्रेत त्याला कवीची यक्षनगरी पहायला मिळते, आणि कवीचा भावनाप्रवाह नियन्त्रित होङ्क्षून, सारखा चालत राहून त्यांत त्याच्या १ छन्द या शब्दाची सुचविण्यांत आलेली व्युत्पति मोठी बोधप्रद आहे. 'छन्दयति आह्लादयति अिति छन्दः” असे कोणी महणतो, तर यास्क *मन्त्रा मननात् छन्दांसि छादनात्” या सूत्राने आच्छादन करणारे, रक्षण करणारे ते छन्द, असें म्हणतो.