पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने R काही छन्दोविषयक प्रश्न R ■ =ܘܓ छन्दःशास्त्र हें पद्यरचनेचें व्याकरणच होय. हें शास्त्र पद्याच्या घटनेचा म्हणजे लयबद्ध अक्षररचनेचा विचार करितें. व्याकरण हें अर्थपूर्ण शब्द जोडून होणा-या वाक्यांचा आणि त्या वाक्यांच्या घटकांचा विचार करितें तर छन्दःशास्त्र हैं लघुगुरु अक्षरांच्या जोडणीने होणा-या चरणांचा आणि ते चरण मिळून होणा-या पद्याचा विचारकरितें. व्याकरणाची घटना ही ज्याप्रमाणे वाङमयामागून होते त्याचप्रमाणे छन्दःशास्त्राची रचना काव्यनिर्मितीच्या नन्तर होते. वैय्याकरण हा दैनिक बोलींतील आणि लेखी वाङमयांतील वाक्प्रयोगांचें समालोचन करून शिष्टजनमान्य अतओव रूढ अशा मनेोगत नियमांना स्पष्ट करून माण्डतो तर छन्दःशास्त्रकार हा पूर्वकालीन कवींच्या कृतींचें पृथक्करण-वर्गीकरण करून कवींनी नकळत अनुसरलेल्या मनोगत छन्दांना स्पष्ट करितो. कवीच्या विविध मनोगत स्वरान्दोलनाला अनुकूल अशी रचना तो अक्षरसङ्खया, लगक्रम आणि यति अित्यादिकांनी नियमबद्ध करून ठेवितो. व्याकरणाच्या घटनेनन्तर ज्याप्रमाणे व्याकरणबाह्य प्राचीन प्रयोग हे व्याकरणाच्या पूर्वीचे म्हणून क्षम्य तथापि अननुकरणीय मानण्यांत येतात त्याचप्रमाणे प्राचीन कवींचे छन्दोदोष हे क्षम्य पण अननुकरणीय गणायचे असतात. भाषा ही जिवन्त आहे तोंपर्यंत ती ओखाद्या व्याकरणाने नि कोशाने सर्वथैव बद्ध होोंधूं शकत नाही, आणि तिच्यांत नवनव्या वाक्प्रयोगांची भर पडत राहते; त्याचप्रमाणे काव्य हें जिवन्त आहे तोंपर्यन्त तें ठराविक छन्दःप्रकारांत पूर्णपणें अडकून रहात नाही, तें नवनवे छन्द:प्रयोग करून पाहतें. प्रभावी लेखकांचे नवनवे वाक्प्रयोग परिणामकारक वठल्यास रूढ होतात त्याप्रमाणे कवींचे नवनवे छन्द, कविता सरस आणि चटकदार झुतरल्यास अनुसरिले जाश्रुन रूढ होतात. सुशिक्षितमान्य अतओव शुद्ध अशा भाषेत रचना करावयाची असल्यास ज्याप्रमाणे व्याकरणाकडे अवश्यमेव लक्ष्य द्यावें लागतें, त्याचप्रमाणे रूढ' नि सहजगम्य अशा छन्दांत सुद्धा शुद्ध रेखीव रचना करावयाची असल्यास त्या छन्दांच्या घटनेचें ज्ञान अवश्य पाहिजे. बोलायला आपण केवळ अनुकरणाने, व्याकरण न शिकतांच, लागतों; पण शुद्धच बोलतों असें नाही. पद्यरचनाहि सहजच मनोगत आन्दोलनानुसार होभू लागते, पण ती रेखीव
पान:छन्दोरचना.djvu/30
Appearance