Jump to content

पान:छन्दोरचना.djvu/29

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना R १ गद्य आणि पद्य । बहिरड्गाकडे पाहिल्यास वाङ्मयाचे गद्य आणि पद्य असे दोन प्रकार आढळतात. जें आपल्या नेहमीच्या बोलण्यासारखे (८ गद्) तें गद्य होय. गद्याचे अर्थपूर्तीच्या अनुरोधाने जे तुकडे पडतात त्यांना वाक्यें म्हणतात. गद्यांत या वाक्यांची लाम्बी किती असावी, आणि त्यांची अक्षररचना कशी असावी याविषयी, म्हणजे वाक्यांत अक्षरांची सङ्ख्या, लघुगुरुक्रम आणि विरामस्थान यांविषयी काही नियम नसतो. अर्थाकडेच लक्ष्य देॠन ठिकठिकाणीं न्यूनाधिक विश्राम घेत जें आपण नेहर्माच्या बोलण्याप्रमाणे, आणि केलाच तर स्वरांत किञ्चित् चढञ्जुतार करून चुच्चारितों तॆ गुह्यं होय. ज्याचे तुकडे म्हणजे पाद वा चरण हे गद्यांतील वाक्यांप्रमाणे अर्थपूर्तीच्या अनुरोधाने पडत नाहीत तर मुख्यत्वें नियमित अन्तराने येणा-या विरामांच्या ठिकाणीं पडतात, आणि ज्याच्या चरणांतील अक्षररचनेला अक्षरसङ्ख्या आणि लगक्रम या गोष्टींत काहीतरी नियम असल्यामुळे जें स्वाभाविकपणेंच अर्थीपेक्षा लयीकडे अधिक लक्ष्य देझुन ओकन्दरीने सलगपणें, गळ्यावर, काही ठराविकच ठिकाणीं ठराविकच वेळ थाम्बत, म्हटलें जातें तें पुट्टा होय. पद्य म्हणजे लयबद्ध अक्षररचना होय. पद्याची काही चाल असावी म्हणून पद्यांत ठराविक लाम्बीचे पार्द वा चरण म्हणजे अक्षरावली असतात. गद्याचें सारख्या लाम्बीचे तुकडे पाडून ते ओकाखाली ओक असे माण्डून त्याचें पद्य करितां येअील. पण हें दिखाञ्भू पद्य होऔील, त्याला छन्द-पण येणार नाही. लिहिल्यासारखा अक्षुश्चार करीत थोडेसें गळ्यावर म्हणायला लागतांच जें गोड लागतें, आणि जें अन्तर्गत लयबद्धतेमुळे सहज अवगत होतें तेंच खरें पद्य होय. छन्दपण हैं या सहज लयबद्धतेंतच असतें. Wran-MY1"YYY.M.'s ---, -wa. १ ** गद्यं पद्यमिति प्राहुर्वाङ्मयं द्विविधं बुधाः ” ( गछ ६/१ ) २ ‘ अनिबद्ध पदवृन्दं तथा चानियताक्षरम् । अथोपेक्षाक्षरयुतं ज्ञेयं चूर्णपदं बुधैः” (भ १५/३५) ३ ' पादेन संयोगात् पद्यम् ” (हपि ५२). ४ ** नियताक्षरसम्बन्धं छन्दोयतिसमन्वितम् निबद्धन्तु पदं ज्ञेयं सतालपतनात्मकम् ?’ (भ ३२/२९)