पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना नि शुद्ध होतेच असें नाही. व्याकरणाने ज्याप्रमाणे भाषेतील अमुक शुद्ध नि तमुक अशुद्ध कां हें समजतें नि दुस-याला समजावून देतां येतें त्याप्रमाणे अमुक पद्य शुद्ध कां नि तमुक अशुद्ध कां हें छन्दःशास्त्राने समजतें आणि दुस-याला स्पष्ट दाखवितां येतें. व्याकरण शिकल्याने ज्याप्रमाणे फार तर चार वाक्यें शुद्धपणें बोलतां लिहितां येतील, पण आदर्शभूत जिवन्त गद्य लिहितां येओीलच असें नाही, त्याप्रमाणे छन्दःशास्त्राच्या अभ्यासाने ओक दोन शुद्ध पद्ये अतिक्रिष्ट वृत्तांतहि रचितां येतील, पण सरस प्रवाही काव्य हें निसर्गदत्त प्रतिभेविना, केवळ छन्दःशास्त्राच्या बळाने निर्माण करणें अशक्य आहे. झुत्कृष्ट काव्यरसाला छन्दःशुद्ध पद्याचें घाटदार पात्र अिष्ट आहे, परन्तु रसाची तहान घाटदार सुवर्णपात्राच्या दर्शनाने भागणार नाही. केवळ छन्दःशुद्ध पद्य म्हणजे काव्य नव्हे. पद्य हें काव्याचें केवळ शरीरे होय. तें सप्रमाण आणि सुरेख पाहिजेच. पण हें कलेने नटवायचें शरीर रमणीय भावार्थाने सचेतन हव; शूडगारलेलें कलेवर काय कामाचें ? ३ पद्यक्षेत्राचा सङ्कोच सारस्वताचा म्हणजे संस्मरणीय वाङ्मयाचा आरम्भ पद्यांत होतो आणि काही कालपर्यन्त त्याची वाढहि पद्यांतच होते. मनुष्य हा गायनप्रिय असल्यामुळे काही पद्यरचना म्हणजे गेय शब्दरचना ही आपोआप सम्भवते; अथवा ओढून ताणून काही शब्दरचना गेय होोंधूं शकते. तिच्याविषयी चमत्कार वाटतो. ती ध्यानांत ठेवावीशी वाटते आणि सहज ध्यानांत रहातेहि. तेिचें अनुकरणहि करावेसें वाटते. पद्य हें सहज तोण्डपाठ हो।श्रृं शकतें आणि दीर्घकाळपर्यन्त ध्यानांत राहतें हें पद्याच्या यशाचें ओक मुख्य sMVYSM'sM'NMY १ ‘ अिति वृत्त तु काव्यस्य शरीरं परिकीर्तितम् ’ (भ २१/१ ) २ ओका चुरमुरे-विक्याने आपलें नेहमीचेंच वाक्य पण मारून-मुटकून 'सुकुमार असुनि तू फार” या पद्याच्या चालीवर बसविल्याने मोठं कुतूहल श्रुत्पन्न करून आत्मप्रसिद्धि मिळविलेली माझ्या पहाण्यांत आहे. त्याचें वाक्य असें, “ शेङ्गदाणे, गरम चिरमुरे, खारे फुट्टाणे फुट्टाणे खारे, चिरमुरे, गरम शेङ्गदाणे !”
पान:छन्दोरचना.djvu/31
Appearance