पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना ->oooe=> अध्याय १ ला काही छन्दोविषयक प्रश्न ‘ अये कविमनोभवे, सहजसम्भवे स्वामिनी, सु-वर्णमयदेहिनी, नवरसात्मके, भामिनी, प्रसाद-मयजीविते, अनुविचारसञ्चारिणी, चमत्कृतिविलासिनी, रासकसन्मनोहारिणी !' (च ११५) अशा यथार्थ शब्दांनी ज्या 'कविता-रती’चें आवाहन राजकवि चन्द्रशेखर यांनी केलें आहे तिचा सहवास जितका हृदयङ्गम नि सरस असणार तित काच तिच्या अवयव-रचनेचा म्हणजे छन्दःशास्त्राचा अभ्यास हा केवळ बुद्धि गम्य आणि रुक्ष वाटणार हैं झुघड आहे. काव्यानुभूतीच्या पुढे जर काव्यमीमांसा ही नीरस आणि अनावश्यक वाटते तर पद्याच्या म्हणजे काव्याच्या शरीराच्याच रचनेचा विचार करणारी छन्दी-विचिति ही किती शुष्क आणि व्यर्थ वाटेल! परन्तु छन्दःशास्त्राचें ज्ञान हैं जितपत कवीला अवश्य आहे तितपत रासक वाचकालाहि आहे. रसिक हा जाणता नि चिकित्सक होण्याला या शास्त्राच्या' अभ्यासाचें साह्य होतें. मनुष्यप्राणी हा जसा सहृदय तसाच बुद्धिमानहि आहे. केवळ अनुभव घेथून तो स्वस्थ रहात नाही. अनुभवांचा तुलनात्मक अभ्यास करून मूलभूत नियम शोधून काढण्यांत मनुष्याला पराकाष्ठेचा आनन्द वाटूं शकतो. काही मनुष्यांच्या या शोधक प्रवृत्तीमुळेच विविध शास्त्रे निर्माण झालीं आहेत. छन्दःशास्त्राचीहि झुत्पति अशीच असली पाहिजे.
पान:छन्दोरचना.djvu/28
Appearance