Jump to content

पान:छन्दोरचना.djvu/134

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने oVS वृत्तविचार लघु नसावीत. म्हणजे विषमचरणारम्भीं (-७ ७ -), (:- ७ ७ ७ ), (७ ७ ७ -) आणि (७ ७ ७ ७ ) हे चार गण वज्र्य होत. हे चार गण समाचरणारम्भौहि वज्र्यच आहेत. यांच्या भरीला (-- ७ - ) आणि (७ - ७ -) हे दोन गण विषमचरणारम्भीं वज्र्य नसून समचरणारम्भीं वज्र्य दिसतात. अनुष्टुभांतील समाचरणाची त्रिपदी पुढील पद्यांत आहे.

  • द्यावया नाव चालना पाअल पहिलें पडी हो तूं मला अनुव्रता ” (पु. मं. लाड ) परन्तु तिस-या चरणाची आवृत्ति प्रत्येक त्रिपदींत असल्याने त्याला ध्रुवपदाचें स्वरूप प्राप्त होतें आणि प्रत्येक कडव्यांत द्विपदीच झुरते. ‘ बल-तेजास वाढवीं

दुसया शुभ पावलीं ” हो तू० अनुष्टुभ छन्दाप्रमाणेच दुसरे काही पद्यप्रकार असे आहेत की त्यांना वृत्त वा जाति यांपैकी कोणत्याच वर्गात समाविष्ट करितां येत नाही. चरणाचा काही भाग वृत्ताप्रमाणे अचल असतो; पण झुरलेला भाग पूर्णपणें जातिस्वरूप नसतो. अपरान्तिका, आपातलिका, झुदीत्त्यवृत्ति, झुपचित्रा, चारुहामिनी, चित्रा, प्रवृत्तक, प्राच्यवृत्ति, वानवासिका, विश्लोक अित्यादि पद्यप्रकारांपैकी काहींचीं झुदाहरणें वृत्तस्वरूप दिसल्यामुळे त्यांचा विचार वृत्तप्रकरणीं केला आहे. या ठिकाणीं वैतालीय, औपच्छन्दसिक, गीति आणि आर्यांगीति यांचाच विचार कर्तव्य आहे. वैतालीय : ] - -- - + | ܟ + ܢ -F1[ [ — — + — I + v + v + ] ज्या ठिकाणीं शुद्ध गुरूच हवा असतो आणि दोन लघू चालत नाहीत तेथे (+) ही खूण योजिली आहे. सूत्रकृताङ्गांत वैतालयाचे बरेच श्लोक आहेत. त्यांतील चरणांचें पृथक्करण करितां असें दिसतें की विषम चरणांचे आठ मात्रांचा आणि सहा मात्रांचा