Jump to content

पान:छन्दोरचना.djvu/133

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने

छन्दोरचना
१०६

परन्तु चरणारम्भींचीं चार अक्षरें कशी असावीत याविषयी काहीच बोध होत नाही.
 भगवद्गीतेतील अध्याय १, ५, ७, १०, १२, १४ नि १६ या सात अध्यायांतील मिळून २१९ श्लोकांचें पृथक्करण करून पहातां,
 (१) समचरणान्ती (‿ _ ‿ _) हा गण निरपवादपणे आढळला.
 (२) विषमचरणान्ती (‿ _ _ _) हा गण शेकडा नव्वदाहून अधिक वेळां आढळला. ४३८ विषमचरणांपैकी अन्तीं (‿ ‿ _ _) हा गण अेकाच चरणांत, (‿ ‿ ‿ _) हा १५ चरणांत, (_ _ _ _) हा १० चरणांत, (_ ‿ _ _) हा ७ चरणांत आणि (_ ‿ ‿ _) हा ९ चरणांत आढळला. म्हणजे काय, 'पञ्चमं लघु सर्वेषु' हा नियम सुद्धा विषम चरणांत निरपवाद नाही.
 आरम्भींचे चतुरक्षरी गण पुढीलप्रमाणे आढळले.

विषमचरणारम्भी समचरणारम्भी
१ [_ _ _ _]  ७७ वेळां ७४ वेळां
२ [‿ _ _ _] ५० " ५२ "
३ [_ ‿ _ _] ६० " ६६ "
४ [_ _ ‿ _] ३९ " शून्य "
५ [_ _ _ ‿] ३७ " ५० "
६ [‿ ‿ _ _] ३० " ३९ "
७ [_ ‿ ‿ _] शून्य " शून्य "
८ [_ _ ‿ ‿] ३१ " ३७ "
९ [‿ _ _ ‿] १९ " ३६ "
१० [‿ _ ‿ _] २६ " शून्य "
११ [_ ‿ _ ‿] २७ " ४३ "
१२ [‿ _ ‿ ‿] १७ " २४ "
१३ [‿ ‿ _ ‿] २५ " १७ "

 यावरून असें म्हणतां येओल की विषमचरणारम्भीं कोणताहि चार- अक्षरी गण चालेल; परन्तु त्याचें दुसरें नि तिसरें अक्षर हीं दोन्ही अकसमयावच्छेदें