अप्पासाहेबांचा एकही विजय त्यात नाही आणि इथं कथेमध्ये मोठा विरोधाभास तयार होतो. जर का अनंतरावांना महाराष्ट्रभूषण पदवी देण्याइतका समाज जिवंत असेल, केवळ एका भाषणावर जर का समाज अनंतरावांना भरघोस मतं देत असेल आणि जर का खुद्द अप्पासाहेबांचा मुलगा हासद्धा शेवटी वडिलांचा राग करून, अनंतरावांकडे जात असेल, तर मग तुम्ही कोणत्या समाजाविषयी तक्रार करीत आहात? मग प्रश्न पडतो, की अशा तऱ्हेने वागणाऱ्या समाजाने समाजवादाला मान्यता दिलीच कशी? मला वाटतं, कथावस्तूचा गाभा थोडा ठिसूळच आहे.
असं म्हटलं म्हणजे साहित्य समीक्षक लगेच म्हणतील, की लेखकांना कथावस्तूमध्ये बदल करायला सांगणं हे आपलं काम नाही. मी फक्त एवढंच सांगायचा प्रयत्न करतो आहे, की कथानक जर वास्तवाच्या जवळ आणायचं झालं तर काय करावं लागेल.
एक कल्पना करूया. हा जो काही सामना झाला, एका बाजूला कारखानदार आणि दुसऱ्या बाजूला कार्यकर्ता यांच्यातील, हा जरा एकाकी, एकाच संघर्षाला महत्त्व देणारा झाला. त्यातून चुकीची समजूत होण्याची शक्यता आहे, की कारखानदार तेवढे सगळे भले आणि कार्यकर्ते तेवढे सगळे वाईट, आता माझी परिस्थिती अशी विचित्र आहे, की मी उद्योजकतेचा पुरस्कार करणारा आंदोलक आहे. म्हणजे थोडासा अप्पासाहेब आणि थोडासा अनंतराव! किंबहुना, अनंतरावांचा विचार मांडण्याकरिता अप्पासाहेबांची साधनं वापरणारा मी. खली व्यवस्था करण्याकरिता कारखाना काढणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच ज्यांच्याकडे पैशाचंसुद्धा भांडवल नाही अशा शेतकऱ्यांचं संघटन करणं हीही गोष्ट तितकीच महत्त्वाची आहे. उद्योजक म्हणजे कारखानदार नाही; किंबहुना हिंदुस्थानात एखादा उद्योजक कारखानदार असला, तर मला माहीत नाही; खरा उद्योजक जर कोणी असेल, व्यावसायिक असेल तर तो ग्रामीण भागातला शेतकरी आहे. त्याच्याबद्दल काही या कादंबरीत उल्लेख नाही; पण ते लेखकाचं स्वातंत्र्य आहे. पण, मला असं वाटतं, की अप्पासाहेबांबरोबर, जे एसेम जोशींशी साधर्म्य असलेले दाखविले आहे. अप्पासाहेब पेंडशांसारखं एखादं पात्र हवं होतं, जे अर्थवाद मांडत नाही; पण समूहवाद मांडतात.
मी समाजवाद हा शब्द न वापरता समूहवाद हा शब्द जाणूनबुजून वापरीत आहे. अर्थकारणाकरिता समाजाचं प्राधान्य मानणारे ते समाजवादी. व्यक्तिगत निर्णय हा योग्य नसतो, समाजाकरिता जे निर्णय घ्यावे लागतात, ते शेवटी