कादंबरीचं नाव 'सामना' आहे. सामना कुणाचा आहे ? गोष्ट साधारणपणे अशी - एक स्वकर्तृत्वावर उभा राहिलेला कारखानदार अनंतराव आणि दुसरा, आपण जन्माला आलो आहोत तेव्हा आपण समाजाचं काही देणं लागतो असं ऋण मानणारा एक कार्यकर्ता अप्पासाहेब. या दोघांमधला हा सामना आहे.
मी शाळेमध्ये असताना लिहायचो. ललित लेखन करायचो, कविताही करायचो आणि मला असं आठवतं, की 'सामना'च्या धर्तीचे कथाबीज असलेली एक कथा मी पार्ले टिळक विद्यालयामध्ये असताना विद्यालयाच्या हस्तलिखितात लिहिली होती. शाळेमधील दोन विद्यार्थी. एकाचे वडील हे रिझर्व्ह बँकेत अधिकारी. म्हणजे तो विद्यार्थी घरचा सुस्थितीतील. तसंच अभ्यासातही चांगला, खेळातही चांगला आणि दुसरा जो विद्यार्थी होता तो घरची गरिबी असलेला आणि गरिबी असल्यामुळेच आपण गुणवंत आहोत अशी कल्पना करून बसलेला. सानेगुरुजींनी आम्हाला सांगितलं होतंच, की धट्टीकट्टी गरिबी आणि लुळीपांगळी श्रीमंती! साहजिकच, 'सामना'त जशी एक विद्या आहे, तशीच माझ्या कथेतही एक मुलगी होती आणि त्या लहानशा गोष्टीचा शेवट असा होता, की त्यातला जो श्रीमंत, कर्तबगार असा मुलगा हा बॉक्सिंगचा चँपियन असतो आणि स्पर्धेमध्ये केवळ त्याला आव्हान द्यायचं म्हणून हा दुसरा मुलगा, त्याची बॉक्सिंगमध्ये टिकण्याची काही शक्यता नसताना, बॉक्सिंगला उभा राहतो. चँपियनला वाईट वाटतं, की आपण याच्यावर कसा काय हल्ला करावा; पण तो सहजच मूठ हलवतो आणि समोरचा खाली पडतो आणि गोष्टीचा शेवट त्या मुलीच्या किंकाळीने होतो. इथे शिवराज गोर्लेचं कथासूत्र आणि माझं त्या काळचं कथासूत्र यात मोठा फरक आहे.
शिवराजांच्या कथेमध्ये कर्तबगाराचे विजयच विजय होत जातात. पहिल्यांदा नायिका विद्या मिळते त्याला. नंतर महाराष्ट्रभूषण पदवीही मिळून जाते. त्यानंतर निवडणुकीतही विजय मिळतो. मला निवडणुकीच्या प्रचाराचा काही अनुभव आहे. शिवराज गोर्ल्यांनी ज्या तऱ्हेचा प्रचार दाखविला त्या तऱ्हेचा प्रचार केला तर अनंतरावांचं डिपॉझिट राहिलं नसतं; पण या कादंबरीत तसा प्रचार करूनसुद्धा लोकांमध्ये अशी काही परिवर्तनाची लाट उसळली, की अनंतराव निवडणूक जिंकून गेले आणि त्याहीपेक्षा मोठा गहरी घाव बसल्यासारखा हल्ला कोणता असेल तर तो म्हणजे अप्पासाहेबांचा मुलगा अजितेम हा स्वतःच मुळी अनंतरावांच्या बाजूने होता.
कर्तबगार अनंतरावांचे हे चार विजय कादंबरीत दाखविले आहेत, कार्यकर्ता