हे पान प्रमाणित केलेले आहे.
स्थान देऊ शकल्या असत्या अशा दोन मोठ्या सुवर्णसंधी हुकवल्या आहेत.
प्रणव मुखर्जीनी या अर्थसंकल्पाच्या निमित्ताने, अर्थशास्त्रामध्ये बऱ्याच काळापासून चर्चेत असलेला एक प्रश्न ऐरणीवर आणला, याबद्दलतरी निदान त्यांना श्रेय द्यावेच लागेल.
आर्थिक मंदीवर उतारा काय? आर्थिक मंदी 'खड्डे खणा, खड्डे बुजवा' आणि 'अन्नछत्र' यांसारख्या कार्यक्रमांना प्रोत्साहन देते की उद्योजक आणि पोशिंद्यांना प्रेरणा देते ? भारताचा येत्या दोनतीन वर्षांतील अनुभव, अगदी रिकार्डोच्या काळापासून उकल न झालेल्या या समस्येचे निःसंदिग्ध उत्तर देईल.
(२१ जुलै २००९)
◆◆
'अर्थ' तो सांगतो पुन्हा / १६०