Jump to content

पान:अर्थ तो सांगतो पुन्हा (Artha to Sangato Punha).pdf/160

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.





विलक्षण भाववाढीचे घटित


 कीकडे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती अभूतपूर्व पातळीवर पोहोचल्या आहेत आणि त्याच वेळी सरकार मात्र महागाईचा दर हा न्यूनतम, किंबहुना उणे असल्याचा दावा कशाच्या आधारावर करीत आहे हे कळेनासे झाले आहे. या दोन्ही गोष्टींमुळे समग्र जनतेच्या मनात असंतोष खदखदत आहे.
 'महागाईचा दर' हा चालू आठवड्यातील आणि वर्षापूर्वीच्या याच आठवड्यातील किमतीच्या परिस्थितीच्या मूळ निर्देशांकांच्या आधाराने काढलेला निर्देशांक असतो.
 आजचा महागाईचा दर उणे आहे याचा अर्थ आजचा 'घाऊक किंमत निर्देशांक' वर्षभरापूर्वी याच दिवशीच्या 'घाऊक किंमत निर्देशांका'पेक्षा बराच कमी आहे, एवढाच होतो.
 मात्र, ग्राहकाला मोठ्या कष्टाने प्रत्यक्षात ज्या किमतीना तोंड द्यावे लागते त्या 'ग्राहक किंमत निर्देशांका'च्या प्रभावाने ठरतात.
 'ग्राहक किंमत निर्देशांक' काही ठराविक मालांच्या एका आधारभूत कालखंडातील एकत्रित किमतीच्या तुलनेत आजच्या किमतीची पातळी दाखवतो.
 या निर्देशांकाचे चढउतार कसे होतात याच्याशी सर्वसामान्य माणसाला काही देणेघेणे नसते, त्याच्या दृष्टीने आजघडीला आपल्या गरजा भागविण्यासाठी बाजारात प्रत्यक्षात काय किंमत मोजावी लागते, हेच महत्त्वाचे असते.
 किमती मुळात बाजारातील पुरवठा आणि मागणी यांच्या प्रमाणातील अन्योन्य परिस्थितीवर ठरतात. ज्या बाजारपेठेतील किमतींचा अभ्यास केला जातो, त्या बाजारपेठेचे स्वरूप काही, किमतीचा नूर ठरवत नाही.

 बाजारपेठेच्या या किंवा त्या स्वरूपानुसार किमतीचा नूर ठरतो असे मानणे म्हणजे शुद्ध खुळचटपणा ठरेल. उदाहरणार्थ, वायदेबाजारातील किमती किंवा अगदी आंतरराष्ट्रीय बाजारातील किमती, एवढेच नव्हे तर सार्वजनिक वितरण

'अर्थ' तो सांगतो पुन्हा / १६१