हे पान प्रमाणित केलेले आहे.
खरे म्हटले तर, दोन उपाययोजना आवश्यक होत्या. अनेक पाहणी अहवालांनी शिफारस केली आहे, त्याप्रमाणे शेतकऱ्यांना ४ टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून द्यावे. त्याने प्रश्नाची झळ कमी व्हायला मदत झाली असती. पण, सर्वांत परिणामकारक उपाय म्हणजे 'जमिनीची बाजारपेठ' उभी करणे. अशी बाजारपेठ उभी झाली, तर आत्महत्येच्या कड्यावर उभा असलेला शेतकरी आपली जमीन स्पर्धात्मक किमतीला विकून समस्यामुक्त होऊ शकेल; ज्या शेतकऱ्यांना जागतिक बाजारपेठेच्या स्पर्धेला तोंड देत, शेती करीत राहणे अवघड वाटते आहे अशा शेतकऱ्यांना शेतीतून निवृत्ती घेऊन, अन्य व्यवसायात प्रवेश करणे शक्य होईल.
(६ मार्च २००६)
◆◆
'अर्थ' तो सांगतो पुन्हा / १२०