पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/८९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सीमा ओलांडून अन्य देशांवर पडत होता. दक्षिण आशिया व दक्षिणपूर्व आशिया येथे भारतीय संस्कृती नांदत होती याचे पुरावे या भागांमध्ये जागोजागी आढळतात. (अगदी लॅटिन अमेरिकेपर्यंत भारतीय संस्कृतीचा प्रभाव होता असे अनेक पुरावे सापडलेे आहेत.)भारतीय तंत्रज्ञ वेगवेगळ्या प्रकारच्या धातूंची व मिश्र धातूंची निर्मिती, वनस्पतिजन्य व खनिज पदार्थजन्य औषधे, अतितलम वस्रप्रावरणं अशा वस्तू भारताखेरीज इतरत्न नव्हत्या व सातासमुद्रापलीकडे जाऊन त्यांचा व्यापार करून व्यापारी वर्गाने भारताला जगातला सर्वात वैभवी देश बनविले होते. धर्म, तत्त्वज्ञान व रणांंगणावरील पराक्रम यातही भारताचा हात धरणारा कुणी नव्हता. भारत हा एक 'गरुड' होता.
 त्यानंतर परिस्थिती बदलली. आक्रमक, विजिगिषुु व परिवर्तनशील मनोवृत्तीवर स्थिरताप्रिय व आत्मकेंद्री मनोवृत्तीने विजय मिळविला. सतत पडणारे दुष्काळ व सरस्वती नदीचं लुप्त होणंं या कारणांमुळे एकेकाळचा उन्नत भारतीय समाज देशोधडीला लागला, असं इतिहासकारांचंं म्हणणंं आहे.काहीही असलं तरी त्याचा परिणााम व्हायचा तोच झाला. भारतीय समाजाने शहरी समाज व्यवस्था व व्यापारी अर्थव्यवस्था सोडून ग्रामीण समाजव्यवस्था व शेतीप्रधान अर्थव्यवस्था स्वीकारली.अत्यंत बंदिस्त अशी जातिव्यवस्था निर्माण झाली. मुक्त व्यापाराच्या मार्गाने धन मिळवून श्रीमंत बनण्यापेक्षा परमेश्वराची आराधना करून पुण्यसंचय करणंं जास्त प्रतिष्ठेचं मानल जाऊ लागलं. समुद्र प्रवास सोडाच, पण समुद्राला पांय लावणंही महापाप समजलं जाऊ लागलं. पूर्वी तत्त्वज्ञानासारख्या जटिल विषयांचा अभ्यास करणाऱ्या महिलांना घराच्या चार भिंतीत कोंडून त्यांच्यावर चूल आणि मूल या दोनच जबाबदान्या टाकण्यात आल्या. त्यामुळे समाजाची अर्धी बाजू जणू लुळी पडली.
 याचा परिणाम म्हणून तंत्रज्ञान, संशोधन व व्यापार थंडावला. संपत्तीत होणारी वाढ आटली. भारतीय कर्तृत्वाच्या सीमा आक्रसू लागल्या. सांपत्तिक स्थिती खालावली तशी संरक्षण व्यवस्थाही कमजोर होऊ लागली. याचा फायदा घेवून परकीय आक्रमणांंना ऊत आला. त्याचा लढून प्रतिकार करण्यापेक्षा जंगलात सुरक्षित ठिकाणी पळून जाणंं सोयीचं मानले जाऊ लागलं.परिणामी भारतभूमी परकियांच्या तावडीत गेली.

 या संस्कतीचे काही फायदेही होते. बेकारी अजिबात नव्हती, कारण मुलगा जन्माला येताच त्याने मोठेपणी कोणतं काम करायचं हे त्याच्या जातीवरून अगोदरच ठरत असे. सर्व उद्योग व्यवसायांची विभागणी जातींमध्ये झाली होती व ती बंधनं तोडणंंधर्मबाह्य मानले जात असे. यामुळे स्पर्धेचा धोका पूर्णपणे समाप्त झाला होता.खेड्यांतले वाद खेड्यांतच पंचायत पद्धतीद्वारा मिटविण्यात येत. देशावर सत्ता कुणाचीहीअसो, खेड्यातील या स्थितीत कोणताही फरक पडत नसे.

समाज रचनेचा विपरीत परिणाम/८०