पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/८८

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

समाज रचनेचा विपरीत परिणाम

अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf

लणाच्या कासवाला हात लावला तरी ते चटकन थांबतं.आपलं पाय व डोकं कवचात ओढून घेतं.धोका टळेपर्यंत त्याच स्थितीत राहतं. शत्रुवर प्रतिआक्रमण करण्यापेक्षा स्वतःची हालचाल थांबवणंं, आपल्यापासून कोणताही धोका नाही शत्रूच्याा लक्षात आणून देणंं व अशा मार्गाने स्वतःचं संरक्षण करण्याचा प्रयत्न करणंं याला कासवनीती असे म्हणतात.

 एकंदरीत कासवाची हालचाल मंद, संथ व सौम्य असते.आपलं भक्ष्य पकडतानाही वाजवीपेक्षा जास्त उत्साह दाखवत नाही. कासवाचं आयुष्य पुष्कळ असलं तरी जीवन फारसं सक्रिय असत नाही. धोक्याची जाणीव झाल्यावर निःश्चेष्ट पडून राहण्याच्या त्याच्या कृतीमुळे कित्येकदा शत्रुची फसगत होते.हे आपलं भक्ष्य नसून एखादा निर्जीव पदार्थ असावा असं वाटून तो त्याच्या वाटेला जात नाही. अशा ‘अहिंसक’ मार्गाने स्वत:ची सुरक्षितता सुनिश्चित करणंं हे कासवाचंं धोरण असतं.
 आकाशात भरारी मारणारा गरुड नेमका याच्या उलट असतो. विषारी सापासारख्या प्रबळ शठूलाही आपले भक्ष्य बनवण्यास तो मागेपुढे पाहत नाही. गरुडाचंं जीवन म्हणजे सळसळत्या उत्साहाचं प्रतीक आहे. शत्रूचा नायनाट करण्यासाठी आपण त्याच्यावर तुटून पडणं, स्वतःचं स्वामित्व राखण्यासाठी वेळप्रसंगी धोका पत्करणं व प्रतिस्पर्ध्याना नामोहरम करण्यासाठी स्वतःच्या ताकदीचा पुरेपूर वापर करणंं, ही त्याची वैशिष्ट्ये आहेत. म्हणूनच त्याला आकाशाचा सम्राट असे म्हणतात.
 काेेणत्याही समाजाचा विकास हा एक तर कासवाच्या किंवा गरुडाच्या पध्दतीने होतंं आणि या विकास पध्दतीचे प्रतिबिंब त्या-त्या समाजाच्या उद्योगधंदे चालाविण्याच्या पध्दतीत दिसून येतंं.भारतापुरतंं बोलायचं झाल्यास भारतीय समाज आणि भारतीयउद्योग कासव पध्दतीने चालत असल्याचे दिसतं.

{{gap}खरे पाहता भारताचा इसवीसनपूर्व इतिहास लक्षात घेता अशी परिस्थिती नव्हती.तीन हजार वर्षांपूर्वीचा काळ भारताचं सुवर्णयुग म्हणून ओळखला जात होता. भारतीय उत्पादनं,तंत्रज्ञान, व्यापार, औषधपध्दती सध्याच्या भारताच्या

अद्भुतदुनिया व्यवस्थापनाची/ ७९