पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/८६

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


राज्यात मानाचे अग्रस्थान पटकावलेला तेनाली राम हे उत्कृष्ट उदाहरण मानता येईल.तेनाली राम कुशाग्र बुध्दिमत्तेचा, पण अत्यंत विनोदी स्वभावाचा होता. सम्राटाची खुशमस्करी करण्याच्या ओघात तो त्याला राजकर्तव्यांची जाणीवही करून देत असे.त्याच्या चुका दाखवून देत असे. इतकेच नाही तर सम्राट अडचणीत असताना अचूक मार्गदर्शनही करत असे.पण हे सर्व हलक्या फुलक्या आणि हास्य स्फोटक युक्त्या लढवून. दरबारातील इतर मानकच्यांच्या दृष्टीने तो एक विदूषक आणि खुशमस्कच्या होता, पण राजाचा तो मोठा मानसिक आधार होता. तेनाली रामाने खुशमस्करीची कला (आर्ट ऑफ फ्लॅटरी) अशा अत्युच्च पातळीवर नेली की त्यामुळे राजाचा आणि पर्यायाने राज्याचा फायदा झाला.सकारात्मक खुशमस्करीचा हा नमुना इतिहासात क्वचितच सापडेल.
 दुसरे उदाहरण संभाजी महाराजांचं पाहा. त्यांना कुब्जा कलुषीसारखा खुशमस्कच्या भेटला. त्याने राजांना व्यसनं लावली.त्यांची खोटी स्तुती करून आपला स्वार्थ साधून घेतला. त्यामुळे संभाजीराजांचंं राजकारण व राज्यकारभारातील लक्ष उडालं. ते नादी बनले. याचा परिणाम संपूर्ण मराठी साम्राज्याला भोगावा लागला.दिल्लीचे तख्त काबीज करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणारी मराठी सल्तनत खिळखिळी झाली.(कित्येक इतिहासकार कलुषीी प्रकरणाला केवळ दंतकथा मानतात. संभाजी- कलुषा संबंधांना कोणताही ऐतिहासिक आधार नाही असंं त्यांचं म्हणणे आहे. तरीही इथे हे उदाहरण इतिहास सांगण्याच्या उद्देशाने नव्हे तर नकारात्मक खुशमस्करीचा परिणाम किती घातक होते हे दाखविण्यासाठी घेतले आहे.)
 दोन्ही उदाहरणांचा सारांश असा की, चमचेगिरीची माहिती देणंं या पैंंलूंंप्रमाणे खुषमस्करी या पैलूसही सकारात्मक आणि नकारात्मक बाजू आहेत.
 ऐतिहासिक संदर्भ सध्याच्या काळात जसेच्या तसे लागू होत नसले, तरी त्या मागचंं तत्त्व लक्षात घेण्याजोगंं आहे. यानंतर सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की, माहिती पुरविणं व खुशमस्करी करणं यातून चमच्यांना फायदा होतो का? याचे उत्तर होय आणि नाही असंं दोन्ही आहे. संस्थेतील उच्च पदाधिकारी, जे चमचेगिरी चालू देतात ते जागरूक असतील तर संस्थेला घातक ठरेल इतपत फायदा ते चमच्यांना मिळवू देणार नाहीत. निव्वळ चमचेगिरीव. प्रमोशन किंवा उच्च पदं मिळण्याची उदाहरणंं अल्प आहेत. कारण कामगिरी आणि चमचेगिरी यात कामगिरी श्रेठ आहे आणि असलीच पाहिजे. व्यावसायिक पध्दतीने व्यवस्थापन करणाच्या संस्थांमध्ये कामगिरीचाच विचार प्राधान्याने होतो असा माझा अनुभव आहे.

 तरीही चमच्यांना काही सोयी सवलती मिळतातच.(त्या शिवाय हा प्रकार करणार

अदभुत दुनिया व्यवस्थापनाची/७७