पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/८५

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

चमचेगिरीचा वापर

अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf

मचेगिरी ही व्यवस्थापकीय अपरिहार्यता कशी आहे व त्यामुळे तिच्यावर नियंत्रण ठेवणंं व तिचंं योग्य व्यवस्थापन करणं संस्थेच्या हितासाठी का व कसंं आवश्यक आहे याबाबत आपण मागच्या लेखात विचार केला. चमचेगिरीचा वापर कसा व कितपत करून घेतला जातो यावर संस्थेचं हित किंवा अहित ठरतंं.

 केवळ माहिती देणंं आणि घेणंं यासाठीच चमचेगिरी असते असं नाही. खुशमस्करी हा तिचा महत्त्वाचा पैलू आहे. यालाही सकारात्मक आणि नकारात्मक बाजू आहेच.
 मडक्यांच्या उतरंडीचं उदाहरण पहा. ती खालपासून वरपर्यंत लहान लहान हहोत गेलेली दिसते आणि सर्वात वर एकच मडकं एकटेच असते.कोणत्याही संस्थेत सत्तेची उतरंड अशीच असते. सर्वात वरच्या सत्तास्थानी एकच व्यक्ती असते.हाताशी असूनही त्या व्यक्तीचे सर्वात मोठे दुःख एंकटेपणाचं असते. जितकंं सत्तास्थान वरचं तितके प्रतिस्पर्धा जास्त व भावना जाणणारी व सुखदुःख वाटून घेणारी जिवाभावाची मांणसं कमी. शिवाय कामाच्या जबाबदारीचे ताणतणाव अधिक, अशी सत्ताधीशाची स्थितीी झालेली असते.
 अशा वेळी आपला आत्मविश्वास टिकूूवूून धरण्यासाठी, अहंकार सुखावण्यासाठी आणि दडपणांचंं ओझंं हलकं करण्यासाठी त्याला एखाद्या स्तुतिपाठकाची आवश्यकता भासते. ही भूमिकाही ‘चमचा'निभावतो. तो स्वतःकडे कमीपणा घेऊन सत्ताधीशाच्या बुध्दिमत्तेचंं, निर्णयशक्तीचं आणि व्यावसायिक यशाचंं तोंड भरून कौतुक करतो.यामुळे सत्ताधीशाचं नीतिधैर्य उंचावतं. एकटेपणामुळे जाणवणारंं दडपण व ताणतणााव काहीसे कमी होतात. उत्साहवर्धन होते. अशी खुशमस्करी ही एक कला आहे.काहीजणांना ती बरोबर साध्य झालेली असते. सत्ताधीशांचं नीतिधैर्य उंचावलंं की,संस्थेच्या कामगिरीतही सकारात्मक फरक पडतो.

 पूर्वीच्या काळी राजे महाराजे व सम्राट आपल्या पदरी भाटचारण,कवी,नवलााकाार,हजरजबाबी, हुजरे आदींना बाळगत असत, ते मुख्यतः याच कारणासाठी. विजयनगर साम्राज्यातील सर्वात पराक्रमी आणि यशस्वी मानला गेलेला सम्राट कृष्णदेवराय याच्या

चमचेगिरीचा वापर /७६