पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/६९

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


केली जाऊ लागली. माणसाला ‘यंत्र' मानून तशी वर्तणूक त्यांच्याशी ठेवली जाऊ लागली.
 लवकरच असं लक्षात आले की, शिस्तीचा बडगा दाखवून उत्पादकता वाढत नाही. कारण ती कौशल्यापेक्षाही काम करणाऱ्याच्या इच्छेवर अवलंबून असते. एखादा कर्मचारी आठ तास राबला, पण कामात त्यांचं मन नसेल, तर एक तासाइतकंही काम प्रत्यक्षात होत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्याला वेळपत्रकाकडे काटेकोर नजर ठेवण्यापेक्षा त्याच्या कामाचा वेग व गुणवत्ता यांची नोंद ठेवणंं व त्यासाठी कर्मचाऱ्याला प्रेरणाा देणं, मोटिव्हेट करणंं ही आधुनिक व्यवस्थापनाची प्राथमिकता आहे. मात्र, याचा अर्थ शिस्तीला पूर्ण फाटा दिला गेला आहे असंं नव्हे. तर शिस्त आणि इच्छाशक्ती यांचा समतोल साधून कर्मचाऱ्यांची इच्छाशक्ती वाढवणंं व तो काम मनापासून करेल असं पाहणंं याकडे लक्ष दिलं जात आहे. उदाहरणार्थ, एरवी चांगले काम करणारा कर्मचारी घरच्या काही अडचणींमुळे एखादा दिवस नियोजित वेळेपेक्षा उशिरा कामावर आला, तर त्याला लगेच खडसावणं हे.आधुनिक व्यवस्थापनात श्रेयस्कर मानलंं जात नाही. कारण 'माणूस' म्हणून प्रत्येकाला काही ना काही समस्यांशी सामना करावा लागतो. मात्र रोजच उशीर होत असेल तर ती बेशिस्त मानली जावी व समज दिली जावी.
संशोधन व तंत्रज्ञान विकास :
 जॉर्ज बर्नार्ड शॉ या प्रख्यात नाटककाराच्या नाटकात एक संवाद आहे, एक पात्र दुसऱ्याला विचारतं,‘अरे, अमेरिकेमधल्या व्यक्तिस्वातंत्र्याची अवस्था काय आहे.' दुसरा उत्तरतो, 'त्यांनी त्यांचा पुतळा बनवलाय!' याच पद्धतीने काही दशकांपूर्वी उद्योगांनी संशोधनासाठी विविध विभाग बनवले. संशोधनासाठी खास तंत्रज्ञांंची नेमणूक केली.प्रयोगशाळा उघडल्या. अत्याधुनिक साधनंं उपलब्ध करून दिली.थोडक्यात, संशोधन हा उद्योगाचा प्राण न बनवता एक अवयव बनवला.त्यामुळे एक अवयव शरीराच्या चलनवलनात जितका साहाय्यभूत ठरतो. तितकंच योगदान हा 'संशोधन' नामक अवयव उद्योगाच्या विकासात देतो. मात्र जपानने गेल्या पंचवीस वर्षांतजी व्य्वस्थापानशैली रूढ केली,त्यानुसार प्रत्येक कर्मचारी संशोधनात आपलं योगदान देईल अशी पद्धती पाडण्यात आली. म्हणजेच संशोधन ही केवळ उच्च विद्याभूषित तंत्रज्ञानाची मक्तेदारी न राहता संपूर्ण कंपनीचं लक्ष्य बनलं.

 संशोधन म्हणजे केवळ नवी नवी यंत्र किंवा वस्तू तयार करणंं नव्हे, तर नव्या वस्तू ग्राहकांच्या आवशक्यतेप्रमाणे बनवणंं व त्यांचा विक्रम करणंं याचाही संशोधन प्रक्रियेत समावेश होतो. एखादा निष्णाात इंजिनिअर नवीन वस्तू तयार करू शकेल, पण ती बाजारात खपवण्याचंं काम मार्केटिंग कर्मचाऱ्याला करावंं लागतंं. म्हणजेच ही संशोधन प्रक्रिया केवळ अभियांत्रिकी विभागापुरती मर्यादित न राहता खरेदी विभाग,

बदलती व्यवस्थापनाची शैली/६०