पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/६८

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

बदलती व्यवस्थापन शैली

अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf

दा कशासाठी करायचा? या प्रश्नाचं सरळ उत्तर ‘फायद्यासाठी’ असंच दिलं जाईल.कोणत्याही कंपनीचा वार्षिक अहवाल काढून पाहा. त्यात गेल्या १० वर्षांत कंपनीने प्रगती किती केली व फायदा किती झाला याचा आलेख अग्रभागी असलेला पाहायला मिळेल. विसाव्या शतकाच्या प्रारंभापासून अंतापर्यंत ‘फायदा' मिळवणं हेच धद्याचं प्रमुख उद्दिष्ट राहिलं आहे.आणि हा फायदा साध्य करणाऱ्या सर्व साधनांना कंपनीचं भांडवल किंवा ‘अॅसेट्स’म्हणून ओळखलं जातं. यात कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.मात्र एकविसाव्या शतकापासून अचानकपणे या मनोवृत्तीत बदल घडत आहे.

 पैसा, यंत्रसामुग्री किंवा साधनसंपत्ती फारशी नसणाऱ्या काही नव्या कंपन्या पारंपरिक पध्दतीने चालणाऱ्या व प्रचंड व्याप असणाऱ्या जुन्या कंपन्यांहून पुढे गेल्या आहेत.टाटा, बिर्ला इतकेच नाही तर उद्योगक्षेत्रातील चमत्कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धीरूभाई अंबानी यांनी अनेक दशकं खपून उभ्या केलेल्या साम्राज्यांपेक्षाही अधिक उपलब्धी विप्रो,इन्फोसिस यासारख्या कंपन्यांनी पाच वर्षात करून दाखविली आहे. माहिती तंत्रज्ञान कंपन्यांचं मार्केट कॅपिटलायझेशन पारंपरिक उद्योगांपेक्षा अनेक पटींनी अधिक आहे.
 हे परिवर्तन कसं घडलं असावं? याचं उत्तर व्यवस्थापनाच्या बदलत्या शैलीमध्ये सापडतं.सध्याच्या व्यवस्थापनात (१) शिस्त आणि प्रेरणा यांच्या मिश्रणात उत्पादकता विकसित करणं, (२) संशोधनातून तंत्रज्ञान विकास या दुकलीला प्राधान्य दिलं जात आहे.
शिस्त व प्रेरणा :

 वर सांगितल्याप्रमाणे विसाव्या शतकातील उद्योगांमध्ये भांडवल, इमारती, प्रचंड यंत्रसामुग्री अशा साधनसंपत्तीच्या व्यापाला महत्त्व दिलं जात होतं. या शतकाच्या मध्यापर्यंत उद्योगांच्या विकासाचा वेग प्रचंड वाढला. अर्थात ‘उत्पादकता’ हाच धंद्याचा ध्यास बनला. प्रत्येक कर्मचाऱ्याने जास्तीत जास्त उत्पादन करावं यासाठी वेळेच्या बाबत व काम उरकण्याबाबत कठोर शिस्तीची बंधने घालण्यात आली. कामाचा संबंध कर्मचाऱ्याच्या इच्छाशक्तीशी न जोडता, कालमर्यादेशी जोडण्यात आला. कर्मचाऱ्याने अधिकाधिक ‘वेळ’ कंपनीला दिला पाहिजे अशी अपेक्षा त्या काळातील व्यवस्थापनाकडून

अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/५९