पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/६०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

व्यवस्थापनासमोरील आव्हान

रिअर करू पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसमोर दोन पर्याय असतात.

 १) कोणत्या तरी संस्थेत काम करणंं, म्हणजेच सोप्या भाषेत नोकरी करणं, किंवा ( २) स्वतःचा व्यवसाय सुरू करणंं.
 यापैकी दुसरा पर्याय अधिक आकर्षक असला, तरी त्यात सर्वात मोठी समस्या सुरक्षितता व स्थिरतेची असते. स्वतंत्र व्यवसायात आपली उपजत क्षमता, प्रयत्न व उपयुक्तता खुल्या बाजारात रोज सिध्द करावी लागते. लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात थोडीशी जरी ढिलाई झाली तरी क्षमा केली जात नाही. माणूस 'हिरो'चा ‘झिरो' होण्यास वेळ लागत नाही. सिने अभिनेते, क्रिकेटपटू, कलाकार, डॉक्टर, इत्यादी व्यावसायिक हे व्यक्तिगत प्रतिभेच्या जोरावर हा धोका पत्करतात. मात्र पहिला पर्याय अधिक सुरक्षित मानला जातो.
 संस्थेत महत्त्वाचंं स्थान मिळविण्यासाठी वेळ लागतो. सहकाऱ्यांच्या स्पर्धेला तोंड द्यावं लागतं. मात्र, एकदा स्थान मिळाल्यानंतर हळूहळू किंवा वेगाने प्रगती होते. आपले

अदभुत दुनिया व्यवस्थापनाची/५१