पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/५४

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


अनुभव आहे. त्यामुळे व्यवस्थापकाने भिन्नभिन्न स्रोताचा वापर करून ग्राहकांच्या अपेक्षांबाबत माहिती मिळविणे व त्यानुसार संशोधन करवून घेणं आवश्यक आहे .
संशोधन व तंत्रज्ञान विकासातील गुंतवणूक : विकसित देशांमधील बहुतेक सर्व कंपन्या आपल्या वार्षिक उलाढालीच्या दहा ते वीस टक्के रक्कम संशोधनासाठी खर्च करतात. त्यामुळे हरघडी नव्या आकर्षक, सुबक त्याचबरोबर टिकाऊ किफायतशीर वस्तू बाजारात उतरवणं व ग्राहकांची मनं जिंकणे त्यांना शक्य होतं. भारतीय कंपन्यांनी या पैलूकडे फारसं लक्ष पुरविलं नाही, भारतात संशोधनाचं कार्यही सरकारकडूनच केलं जातं. त्यात खाजगी सहभाग कमी प्रमाणात आहे. सरकारी प्रयोगशाळांमध्ये सरकारी पध्दतीने कामकाज चालत असल्याने संशोधनावर पैसा तर खर्च होतोच, पण फारसं काही हाताला लागत नाही. बदलत्या अर्थव्यवस्थेत संशोधन क्षेत्रामध्ये खाजगी गुंतवणूक वाढविण्यासाठी व्यवस्थापकांनी कसोशीने प्रयत्न केले पाहिजेत. संशोधनावर खर्च होणारा पैसा म्हणजे वायफळ खर्च असं न समजता ती उज्ज्वल भवितव्यासाठी केलेली गुंतवणूक आहे अशी भावना निर्माण होणे आवश्यक आहे.
सामुदायिक संशोधन : आपल्या धर्मग्रंथामध्ये एक अर्थपूर्ण श्लोक आहे.

ॐ सह नाववतु सह नौ भुनक्तु सहवीर्यं करवावहै ।
तेजस्विनावधीतमस्तु विद्विषावहै ॥

 याचा अर्थ असा की, आपण सर्व एकत्र येऊ या, एकत्र जेवू या, एकत्र बलोपासना करू या (आपल्यात तेज आणि बल निर्माण होवो) आणि हे करताना परस्परांबद्दल, द्वेषाची भावना निर्माण न होऊ देऊ या.

 आधुनिक काळामध्ये संशोधन करताना याच तत्त्वाचा उपयोग केला जात आहे. जुन्या काळात शास्त्रज्ञ त्याच्या व्यक्तिगत प्रतिभा व बुध्दिमत्तेच्या आधारावर स्वतंत्रपणे निरनिराळे शोध लावत असत. थॉमस अल्वा एडिसन या शास्त्रज्ञाने एकट्याने एक हजाराहून अधिक शोध लावले होते. सध्याच्या काळात संशोधन व्यक्तिगत पातळीवर न होता सामूहिक किंवा गटाच्या स्वरूपात असा की, कल्पना संकल्पनेची देवाणघेवाण होते. एक व्यक्ती संशोधनाच्या सर्व पैलूंवर एकाच वेळी लक्ष केंद्रित करू शकत नाही. मात्र चार पाच त्याहून किंवा अधिक शास्त्रज्ञाच्या संघाने एखाद्या विषयावर संशोधन केल्यास त्याची गती वाढते. शिवाय संशोधन अधिक अचूक होण्याची शक्यता वाढते. एका गटात विविध क्षमतांचे संशोधक असू शकतात. त्यापैकी प्रत्येकाची बौध्दिक पातळी, मानसिकता, प्राथमिकता व व्यक्तिगत संकल्पना यात फरक असू शकतो. त्यामुळे प्रत्येक संशोधकाच्या उत्तम गुणांचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी मनुष्यबळाचे सुयोग्य व शिस्तबध्द व्यवस्थापन हा तंत्र व्यवस्थापनातील कळीचा मुद्दा आहे.

अनुत् दुनिया व्यवस्थापनाची /४५