पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/५५

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


संशोधनाबरोबरच उत्पादनाचा विक्रय ही महत्वाची बाब आहे. या प्रक्रियेला व्यवस्थापन शास्त्रात व्यापारी व्यवस्थापन (कमर्शियल मॅनेजमेंट) असं म्हणतात.
यामध्ये-
 १. गरजेचे रूपांतर आवश्यकतेमध्ये करणे.
 २. आवश्यकता भागविण्यासाठी सदर वस्तूंची उपलब्धता सुनिश्चित करणे.
 ३. उपलब्ध वस्तू विकण्यासाठी विक्री कौशल्य (सेल्समनशिप) विकसित करणे.
 ४. विक्री किंमत किफायतशीर राखणे यांचा अंतर्भाव आहे.
 सामूहिक संशोधन करताना समूहातील सदस्यांमध्ये संघभावना निर्माण करण हे सर्वाधिक महत्वाचे आव्हान आहे. हे आव्हान स्वीकारण्यासाठी व्यवस्थापकांना पुढील तीन गुण स्वतःमध्ये विकसित करावे लागतात.
 १. कर्तव्यनिष्ठा (सेन्स ऑफ मिशन)
 २. कृतिशीलता (सेन्स ऑफ अँँक्शन)
 ३. प्रामाणिकता (सेन्स ऑफ लॉयल्टी)
कर्त्यवनिष्ठा:
 धौम्य ऋषी आणि त्यांचा लाडका शिष्य आरुणी यांची कथा सर्वपरिचित आहे. पावसाळ्यामध्ये पाण्याने भरलेल्या शेताची जबाबदारी धौम्य ऋषींनी आरुणीवर सोपविली होती. एके दिवशी शेताचा बांध फुटून भरलेले पाणी वाहून जाऊ लागले.ते पाहून छोट्या आरुणीने माती घालून बांध बुजविण्याचा प्रयत्न केला, पण तो यशस्वी झाला नाही. शेतातील पाणी वाहून गेले असते तर पीक उगवू शकले नसते,याची जाणीव झाल्यानंतर त्याने स्वतःच बांधावर आडवे पडून पाणी वाहणे थांबविलं. आपलं वय आणि शक्ती याचा कोणताही विचार न करता त्याने स्वतःला स्वीकारलेली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी झोकून दिलं. यालाच कर्तव्यनिष्ठा किंवा सेन्स ऑफ मिशन असे म्हणतात. आधुनिक व्यवस्थापनामध्ये व्यवस्थापकांनाही हा आदर्श डोळ्यासमोर लागतो.
कृतिशीलता :
 काही वर्षांपूवीं वन मिनिट मॅॅनेजमेंट नावाची व्यवस्थापनशास्त्रावरील सोपं पुस्तक प्रसिध्द झाले होते. त्यामध्ये तीन संदेश देण्यात आले होते. ते असे होते की, व्यवस्थापकांने कर्मचाऱ्याला त्याच्यावर सोपविलेलं काम मिनिटांत सांगावयाचंं, कर्मचाच्याने ते व्यवस्थित केल्यास एका मिनिटात त्याचं कौतुक करायचं व कर्मचाऱ्याने ते काम समाधानकारक न केल्यास त्याची झाडाझडती एका मिनिटातच घ्यावयाची.

 वर वर पाहता हा प्रकार विचित्र वाटेल. पण कर्मचार्यांमध्ये कृतिशीलता निर्माण करण्यासाठी यापेक्षा अधिक प्रयत्नांची आवश्यकता नसते हे अनुभवांवरून आपल्या

आव्हा जागतिक स्पर्धेचे ४६