पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/४९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्याच्याही नकळत आधुनिक व्यवस्थापनशास्त्रामधलं एक महान तत्त्वच जणू या उत्तरानं उद्धृत केलं होतं.
 सुमारे १५ वर्षांपूर्वी भारताच्या अर्थव्यवस्थेत बदलाचे वारे वाहू लागले. त्यापूर्वी समारे ४० वर्षे समाजवादी, बंदिस्त अशा अर्थव्यवस्थेचा आपण स्वीकार केला होता. ही संरक्षित अर्थप्रणाली असल्याने वस्तू उत्पादन करण्याचे तंत्रज्ञानतयार झालेल्या वस्तूंची विक्री करण्यासाठी आधुनिक पध्दती विकसित करण्याकडे आपले उद्योग व सरकार यांचं दुर्लक्ष झालं. बिरबलाच्या शब्दांत सांगायचं तर अर्थव्यवस्था फिरविण्याची कुवत व मानसिकता आपल्या व्यवस्थापनात निर्माण झाली नाही. ‘कशाला उद्याचा बातबघ उडून चालली रात’ अशी वृत्ती बोकाळली. पूर्वसुरींनी घालून दिलेली पध्दतः योग्य, ती ‘फिरविण्याची’, त्यात बदल करण्याची आवश्यकताच काय? अशा भ्रमण समजुतीला आपले उद्योग, त्यांचे मालक, त्यांचे व्यवस्थापन, कर्मचारी, इतकेच नव्हे तर ग्राहक व निर्णय घेणारे राजकारणी चिकटून राहिले.
आव्हान जागतिक स्पर्धेचे :
 सध्या उद्योग क्षेत्रात पसरलेल्या व दीर्घकाळ सुरू असलेल्या मंदीमुळे कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या असुरक्षित झाल्या आहेत. या आव्हानांना तोंड देण्याचे काही मार्ग याबाबत आपण मागच्या दोन लेखांत विचार केला. ‘आधीच दुष्काळ, त्यात धोंड्याचा महिना' या म्हणीप्रमाणे याच वेळेला जागतिक स्पर्धाला तोंड देण्याचं नवं आव्हान उभे राहिल आहे. एकीकडे नोकर्यांच्या असुरक्षिततेमुळे कर्मचाच्यांचा आत्मविश्वास डळमळीत झालेला असताना दुसरीकडे जागतिक स्पर्धाला तोंड देण्यासाठी अधिक काम कराव, हरघडी बदलणारं तंत्रज्ञान स्वीकारण्यास सज्ज असावे, अशीही अपेक्षा कर्मचार्यांकडून केली जात आहे.

 समाजवादी अर्थरचनेत वस्तूंचे उत्पादन व विक्री आणि किंमत यावर सरकारच नियंत्रण असतं. कुणी, काय व किती उत्पादन करायचं, तसंच कोणत्या किमतीला विकायचं हे सरकार ठरवतं. तोच माल ग्राहकाला विकत घ्यावा लागतो. त्याच्या चॉईसला फारशी किंमत व संधी असत नाही. उदाहरणार्थ पंचवीस वर्षांपूर्वी स्कूटर नविण्याचे परवाने फक्त दोन कंपन्यांना दिलेले होते. त्यापैकी एक सरकारी होता, त्यामुळे या कंपन्यांनी तयार केलेली तयार केलेली स्कूटरच विकत घ्यावी लागे. या पध्दतीचा वाईट परिणाम असा की झाला, उद्योगांना स्पर्धेचा सामना करावा लागला नाही. साहजिकच नवं तंत्रज्ञान विकसित करावं, स्पर्धेत टिकून राहण्यासाठी नवी वैविध्यपूर्ण उत्पादन तयार करावीत याची निकड जाणवली त्यांना नाही. बंदिस्त अर्थव्यवस्थेमुळे जगाशी असणारा संपर्क तुटला. बाहेरच्या जगात कोणते परिवर्तन होत

आव्हान जागतिक स्पर्धेचे/ ४०