पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/४८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आव्हान जागतिक स्पर्धेचे (भाग पहिला)

कबराचा दरबार भरला होता. दरबारात एकदम एखादा अडचणीचा खडा

टाकून बिरबलाच्या बुध्दीची परीक्षा घेणंं हा अकबराचा आवडता छंद! त्या दिवशीही त्याने अचानक दरबारातील मानकऱ्यांना प्रश्न केला, “रोटी का करपली? घोडा का अडला? पान का सडले? या तीन प्रश्नांना एकच उत्तर व तेही एका वाक्यात द्या." त्याच्या दरबारातील नवरत्नांपैकी आठ जण डोकं खाजवू लागले. पण बिरबल शांत, त्याचं उत्तर तयारच होतं. इतरांना थोडावेळ विचार करू दिल्यानंतर तो एका वाक्यातही नव्हे तर अवघ्या दोन शब्दांत म्हणाला.
 “न फिरविल्यामुळे’
 (रोटी थापून तव्यावर टाकली की ती सारखी 'फिरवावी' लागते. नाही तर करपते. घोड्यावर बसून प्रवास करत असताना मार्गात काही अडथळा आला तर घोडा ‘फिरवून’ घेऊन बाजूने बाहेर काढावा लागतो, नाही तर पुढचा प्रवास थांबतो. खाण्याचे पान सतत उलटे पालटे करावे लागते, म्हणजेच 'फिरवावे' लागते. अन्यथा ते कुजते.)
 उदारीकरण, जागतिकीकरण, मुक्त अर्थव्यवस्था, ग्राहकांची बाजारपेठ, जागतिक स्पर्धा, भांडवलशाही, तंत्रज्ञानविकास, संगणक आदी शब्दसुध्दा भारतीयांनाच काय तर जगातही कुणाला माहीत नव्हते, त्या साडेचारशे (सुमारे) वर्षांपूर्वीच्या काळात बिरबलाने

अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/ ३९