आहे, याची जाणीव एकतर झाली नाही, किंवा त्याकडे समजूनही दुर्लक्ष करण्यात आलं. काळाप्रमाणे स्वत:ला ‘फिरविण्याचे’ आपण विसरलो.
परिणामी मालाचा दर्जा ढासळला. युरोप व अमेरिकेत तंत्रज्ञानाचा विकास झपाट्याने होत असताना मागे राहिले. कालांतराने चन व जपाननेही त्यांच्या तोडीस तोड आपण मजल मारली व काही बाबतीत आघाडीही घेतली. तरीही आपण जागे झालो नाही. आपलं कुठे तरी चुकत आह व भविष्यकाळात त्यांचे गंभीर परिणाम भोगावे लागणार आहेत, याची कल्पना मोठमोठ्या औद्योगिक घराण्यांना व जनतेच्या वतीने निर्णय घेणाच्या राजकारण्यांनाही आली नाही. आज सर्व व्यवस्थित आहे ना, मग उद्याची काळजी कशाला अशा भावनेत ते मश्गुल राहिले. पण काळ कुणासाठी थांबत नाही.
१२ वर्षांपूर्वी रशियामधील कम्युनिझमचा अंत झाला आणि समाजवादी अर्थरचनेचा समाजवादाला जागतिक आधारस्तभ ढासळला. चतर चीनने अर्थव्यवस्थेबाबत २० वर्षांपूर्वीच तिलांजली देऊन अमेरिकेशी ‘आर्थिक दोस्ती’ केली व भांडवलशाही अर्थकारणाच्या दिशेने पावले टाकावयास सुरुवात केली. रशिया हा जसा भारताचा संरक्षणाच्या दृष्टीने आधार होता. तसा तो व त्याच्या इशाच्यावर चालणारी इतर पूर्व युरोपियन साम्यवादी राष्ट्रे ही भारताचा आर्थिक आधार होती. भारताची बरीचशी निर्यात याच देशांना होत असे. भारताशी मधुर संबंध ठेवणं रशियाला राजकीयदृष्ट्या आवश्यक असल्याने भारतातील कनिष्ठ दर्जाचा मालही रशिया घेत असेत्यामुळे आपल्या निर्यातप्रधान
उद्योजकांना मालाच्या दर्जाबद्दल सावध न राहण्याची सवय जडली. बदलत्या अर्थव्यवस्थेत ती घातक ठरत आहे.
रशियाच्या पतनाबरोबरच भारतीय मालांची निश्चित बाजारपेठही संपली. कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था किती बळकट आहे, हे त्या देशाच्या निर्यातीवरून ठरवलं जातं केवळ निर्यातीच्या प्रमाणावर नव्हे, तर निर्यात मालाचा दर्जा, किंमत पुरवठा, त्याला असणारी ग्राहकांच्या भागवणंच नव्हे तर निर्माण मागणीसध्याच्या गरजा नव्या गरजा करून त्या भागवण्याचे कौशल्य या सर्वांवर अर्थव्यवस्था अवलंबून असते.
यासाठी तंत्रज्ञानाचा विकास करावा लागतो. तंत्रज्ञान, मार्केटिंग, जाहिरात आदी क्षेत्रात बुडणारे नवे बदल स्वीकारावे तर लागतातच, पण स्वतःही बदल घडवून आणावे लागतातही सर्व जबाबदारी व्यवस्थापनावर असतेत्यासाठी व्यवस्थापकांमध्ये स्वत:ला व स्वतःबरोबर इतरांना फिरविण्याची’ क्षमता असावी लागते.
बेसावध अवस्थेतील भारताय उद्योगांना ‘रशियोत्तर' जगात तीव्र जागतिक स्पर्धेचा सामना करावा लागत आहेकाहीही कसेही पिकवा आणि रशियात खपवा अशी स्थिती राहिली नाही. उघड्या जागतिक बाजारपेठेत जागतिक दर्जाचा माल तयार करून