पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/३३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्यांना त्यांच्या कामाचं प्रशिक्षण शासनाकडून दिले जाई. ते गुलाम असले तरी त्यांना समाजात मान होता. मात्र, सुलतानांची चाकरी सोडून अन्य कुणाचंही काम करण्याचा त्यांना अधिकार नव्हता. त्यांना अधिकृतपणे लग्न करण्याची किंवा खाजगी मालमत्ता वाढविण्याची परवानगी नसे. त्यांचं वेतन, पदोन्नती, पदावनती सारं काही सुलतानाच्या हातात असे. समाधानकारक काम न केल्यास किंवा विश्वासघात केल्यास त्यांना ठार करण्याचा अधिकारही सुलतानास होता. पाळलेला कुत्रा जसा त्याच्या सर्व गरजांसाठी मालकावर अवलंबून असतो व त्या मोबदल्यात तो प्राणपणाने मालकाचे संरक्षण करतो तशी त्यांची अवस्था असे. अशा स्थितीत त्यांच्यासमोर दोन पर्याय असत. एक जिवंंत असेपर्यंत सुलतानाची चाकरी करणं. किंवा मृत्यूला सामोरं जाणं. बहुतेक जण पहिल्या पर्यायाची निवड करत.
 ही पध्दत आधुनिक काळाच्या दृष्टीने अमानुष असली, तरी त्यामुळे ओटोमान राजघराण्याचे दोन फायदे झाले. एक, त्याला एकनिष्ठ, प्रामाणिक व पूर्णतः समर्पित अशा नोकरदारांचा कधीही तुटवडा पडला नाही आणि या नोकरदारांना लग्न करण्याचा व संपत्ती जमा करण्याचा अधिकार नसल्याने त्यांच्या पुढच्या पिढीकडून सुलतानशाहीला आव्हान दिलं जाण्याची शक्यता मुळापासूनच नाहीशी झाली.
 पुराणकाळ व इतिहासकाळाच्या या खुणा अंगावर बाळगूनच मानसाने एकविसाच्या शतकात प्रवेश केला आहे.पूर्वीच्या सलतानांची व जमीनदारांची जागा आता अनुक्रमे राजकारणी व उद्योगपतींनी घेतली आहे. भारतापुरतं बोलायचं तर राजकारण व उद्योगक्षेत्र या दोन्ही संस्थांमध्ये घराणेशाहीचा बोलबाला आहे. सत्तेची पदंं (मग ती राजकारणातील असोत किंवा उद्योगातील) आपल्या पुत्रपौत्रांच्या, किमानपक्षाी आपल्या घराण्यातील लोकांच्याच हातात रहावीत यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची सवय सुटलेली नाही. पैसा व वारसाहक्क या सुंद व उपसुंंदांंनी कालमानानुसार आपला पोषाख बदलला, भाषा बदलली पण वृत्ती तशीच आहे. सुलतानशाहीमध्ये सरळ खूनबाजी करून सत्ता बळकावण्याची व सत्ता टिकविण्यासाठी गुलामांंना वेठीस धरण्याची पध्दत होती. सध्याच्या सुलतानांंचे वारसदार शिकले सवरलेले असतात. त्यांना ही रानटी रीत आवडत नाही. त्याऐवजी एकमेकांविरुध्द कोर्टबाजी, कज्जे खटले, प्रसार माध्यमांना हाताशी धरून एकमेकांची निंदानालस्ती, कुलंगडी बाहेर काढणं अशा ‘कोल्ड वॉर’ पध्दतीने उद्देश साध्य करण्याचा प्रयत्न केला जातो.

 नोकर भरतीबाबतही ऐतिहासिक मनोवृत्ती कायम आहे.गुलामीची पध्दती नाहीशी झाली, तरी आपल्या कार्यकर्त्यांना वा कर्मचाऱ्यांना मानसिकदृष्ट्या गुलाम करण्याची किंवा त्यांच्या आर्थिक अडचणींचा फायदा उठवून त्यांना कायमचे आपल्याशी बांंधून

नोकरदारांंची निवड/२४