नोकरदारांची निवड
ध्याच्या कलियुगात राक्षसी प्रवृत्तीने जवळजवळ सर्वच क्षेत्रांत दंगल माजवली आहे. इतिहासकाळापासून आजपर्यंत जगात झालेली आणि चाललेली ९९ टक्के युध्दं व भांडणं यांचं ती मूळ आहे. ते भाऊ म्हणजे ‘पैसा’ व ‘वारसाहक्क'!
यापैकी 'पैसा’ या थोरल्या भावाचं वर्णन ‘अर्थमनर्थम्’ या फक्त एका संस्कृत म्हणीमध्ये सुरेखरीत्या करण्यात आलं आहे. तिचा सरळ, सोपा अर्थ असा की, 'पैसा अनर्थकारी आहे'. तो नसला तरी अनर्थ, असला तरी अनर्थ. ज्याच्यापाशी नाही किंवा अपुरा आहे, त्याला आपली ‘उद्या’ कशी निभणार, याची चिंता, तर गडगंज आहे, त्याला तो राखायचा कसा आणि आपल्यानंतर त्याचं काय होणार याची चिंता!
पैशाचा तितकाच अनर्थकारी धाकटा भाऊ म्हणजे वारसाहक्क. तो पैशाच्या पाठोपाठच जन्मला. या दोघांनी अनेक राज्यं धुळीला मिळवली. घराणी नष्ट केली.उद्योगधंद्यांची वाट लावली. सुखी संसार दु:खीकष्टी केले.
भारतीय उद्योगविश्व व व्यवस्थापन क्षेत्राला या दुकलीने, विशेषतः वारसा हक्काच्या समस्येने बरेच ग्रासलं आहे. त्याचा काय परिणाम झाला आहे व त्यावर उपाय कोणता, याचा विचार या लेखात आपण करणारच आहोत. तथापि, त्यापूर्वी या भावंडांच्या इतिहासाकडे थोडी नजर टाकू या. एक उदाहरण फारच बोलकं आहे.
सुमारे ८०० वर्षांपूर्वी तुर्कस्तान देशात सुप्रसिध्द ओटोमान साम्राज्य उदयास आलं. ओटोमान राजघराण्यातील सर्वात कर्तृत्ववान समजला जाणारा 'महमूद-दुसरा' हा १४५१ मध्ये गादीवर आला, पण गादीवर अधिकार सांगणारे त्याचे इतरही अनेक भाऊबंद होते. त्यांनी त्याच्याविरुध्द बंड करून त्याला अत्यंत त्रास दिला. त्याला वैतागून त्याने शेवटी कायदा केला की, जो सुलतान गादीवर येईल त्याने आपल्या सर्व पुरुष भाऊबंदांना खुशाल ठार करावं. त्याच्यानंतर सत्तेवर आलेला त्याचा पुत्र महमूद तिसरा याने हा कायदा तंतोतंत अंमलात आणून गादीवर येताच आपल्या १९ भावांना सुळावर चढवलं. ईतकेच नव्हे, तर आपल्या वडिलाच्या सात गर्भवती रखेल्यांचे तुकडे करू समुद्रात फेकून दिले. या भावनेनी की न जाणे, त्यांच्यापैकी एखादीला मुलगा