जाते.ही पध्दत प्राचीन आहे.'राजाने गुप्तहेर नेमून मंत्र्यांच्या प्रामाणिकपणाविषयी खात्री
वेळोवेळी करून घ्यावी,’ असं आर्य चाणक्यानेही म्हटलंं आहे. मात्र आपल्यावर लक्ष
ठेवलं जात आहे, याची संबंधित कर्माचाऱ्याला जाणीव होऊ न देण्याची खबरदारी
बाळगावी लागते, ती तशी झाल्यास तो बाजू उलटवू शकतो.
३. बाह्य जगाशी संबंध :
ग्राहक व पुरवठादार यांच्याशी प्रत्येक संस्थेस मधुर संबंध ठेवावे लागतात.एखाद्या
संस्थेची संस्कृती (ऑर्गनायझेशनल कल्चर) कशी आहे हे बाह्य जगाशी असणाच्या
संबंधांवरून ठरतंं. ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करणं व पुरवठादारांचा विश्वास राखणंं या बाबी
जास्तीत जास्त चांगल्या पध्दतीने व प्रमाणात पूर्ण करणारी संस्थाच सुसंस्कृत मानली जाते.
याखेरीज संस्थेच्या कर्मचाऱ्यांची संस्थेबाहेरील वर्तणूक, संस्थेशी संबंध असलेल्या वा
नसलेल्या बाह्य व्यक्तींशी संपर्क ठेवण्याची त्याची पध्दत, सौजन्य, सभ्यता यावरून
संस्थेची 'प्रत' किंवा दर्जा ठरतो. यावर संस्कृती अवलंबून आहे आणि या संस्कृतीवर
संस्थेची जनमानसातील ‘प्रतिमा ’ अवलंबून राहते. अशा तऱ्हेने व्यवस्थाप्रधान संस्था
एखाद्या घरासारखी, बंदिस्त, साचेबंद पण सुरक्षित असते, तर उद्देशप्रधान संस्था
'हाऊस'प्रमाणे चोवीस तास खुली, बहुढंगी पण काहीशी असुरक्षित असते.
ज्या संस्थेशी आपला संबंध येणार आहे, तिचं स्वरूप लक्षात घेऊन आपण अपेक्षा
ठरवाव्यात. संस्थेशी संपर्क आल्यानंतर काही कालावधीतच तिचं स्वरूप लक्षात येतं.
घरच्या प्रेमळ आतिथ्याची अपेक्षा गेस्ट हाऊसकडून ठेवू नये आणि गेस्ट हाऊसच्या
भपक्याची किंवा सोयीसुविधांची अपेक्षा घराकडून बाळगू नये. म्हणजे आपलीच सोय
होते.