पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/२९

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


संस्थेशी एकरूप झालेला असतो. संस्था त्याच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग असते. पैसे मिळवून देणारी जागा इतक्या मर्यादित भावनेने तो तिच्याकडे पाहत नाही.
 उद्देशप्रधान संस्थेतील वरिष्ठ अधिकारी संस्थेत लहानाचा मोठा झालेला असेलच असं नाही. त्यामुळे त्याच्या मनात संस्थेबाबत आत्मीयता असेलच असं नाही. व्यवस्थाप्रधान संस्थेत कर्मचारी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आज्ञेनुसार काम करतो. वरिष्ठांकडून प्रत्यक्ष शब्द आल्याशिवाय तो आपल्या मनाप्रमाणे कार्य करत नाही. त्याला सांगण्यात आलेलं कार्य पूर्ण करण्यासाठी आणखी कर्मचाऱ्यांची आवश्यकता असेल तर तो त्यांना त्याप्रमाणे आज्ञा देतो. थोडक्यात सांगायचं तर वरिष्ठांपासून सर्वात खालच्या कर्मचाऱ्यांचे अधिकार ठरलेले असतात व ज्याने त्याने त्या अधिकारकक्षेत राहून कार्य करायचंं असतंं.
 उद्देशप्रधान संस्थेत अधिकारांची चौकट शिथिल असते. गरज पडल्यास अधिकार नसताना संस्थेच्या फायद्यासाठी कार्य केलं तर उलट कर्मचाऱ्याचं कौतुकच होतं. जसं, आपण दुकानात जाऊन खरेदी करता. दुकानाचा मालक दुकानात नसेल तर नोकर पैसे घेऊन पावती देतो. काउंटरच्या ड्रॉवरमधून उरलेले पैसे परत देतो. कारण माल खपवून पैसे मिळवणंं हा त्या 'संस्थेचा उद्देश' असतो. तो मालकाने किंवा नोकराने साध्य केला तरी चालतो.
 हेच घराचा उतारा काढण्यासाठी तुम्ही सरकारी कार्यालयात जाता. फी भरून घेणारा मनुष्य जागेवर नसेल, तर तो येईपर्यंत तिष्ठत थांबावं लागतं. कारण सरकारी कार्यालय 'व्यवस्थाप्रधान 'संस्था असते.
माहिती मिळविण्याची पद्धती :

 कर्मचारी संस्थेशी किती प्रामाणिक आहे व त्याची क्षमता किती याची माहिती मिळवणंं हा संस्थेच्या अंतर्गत कार्यपद्धतीचा एक महत्वाचा भाग असतो.व्यवस्थाप्रधान संस्थेत ती कागदोपत्री नोंदीवरून मिळवली जाते. कर्मचारी कामावर किती वाजता येतो, किती वाजता जातो, कामाचा उरक किती,दिलेलं काम करण्याची त्याची क्षमता कितपत आहे. याबाबत रोज वरिष्ठांकडून किंवा कर्मचारी स्वतः ठेवत असलेल्या नोंदीवरून अनुमान काढलंं जातं.
हेरगिरीचे महत्व :

 उद्देशप्रधान संस्थेत मात्र, नियुक्ती व पदोन्नतीचे नियम शिथिल असल्याने कामावर घेतलेला कर्मचारी संस्थेशी प्रामाणिक आहे की नाही हे अनुभवावरून कळण्यास जागा नसते. अशा वेळी आपली माणसंं (हेर) त्याच्या अवतीभवती नकळत नेमून तो काय बोलतो,कसा वागतो, वरिष्ठांबाबत त्याचं मत काय याची माहिती गोळा केली

संस्था नावाचे जग/२०