पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/२७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

संस्था नावाचे जग


न्न कसं पचतं, हे बहुतेकांना माहीत नसतं. तरहीही प्रत्येक जण आवश्यकताव आवड या ‘पोटी’ खात असतोच. कारण त्याशिवाय जगणं अशक्य आहे. त्याचप्रमाणे ‘संस्था' म्हणजे नेमकं काय हे बहुतेकांना सांगता येणार नाही. तरीही ‘संस्था माणसाचा स्थायीभाव आहे. संस्थेशिवाय जगणेदेखील माणसाला अशक्य आहे.

 प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या संस्थेचा सभासद किंवा पदाधिकारी असतो. किमानपक्षी संस्थेशी संबंध तरी ठेवून असतो. आपण राहतो ते घर, कामाचं ठिकाण, करमणुकीची स्थानं, मित्रमंडळे, ज्याच्याशी आपला नेहमी संबंध येतो ते सरकार, प्रशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालयं, दवाखाने, रुग्णालयं, बँका, वाचनालय, दुकानं, हॉटेलं या साच्या भिन्न प्रकारच्या संस्थाच आहेत. म्हणजेच आपले वैयक्तिक, कौटुंबिक, आर्थिक, व्यावसायिक, सामाजिक व शैक्षणिक जीवन ‘संस्था'च्या माध्यमातूनच आकाराला येत असतं. संस्थेशिवाय पान हलत नाही इतक्या त्या आपल्याशी निगडित आहेत.
 आपल्याला संस्था म्हणजे काय ते समजल्यास आपलं ‘संस्थात्मक जीवन’ अधिक सुलभ होईल. सदर लेखाचा हाच उद्देश आहे. अर्थात ‘संस्था' ही व्यापक संकल्पना असल्याने एकाच लेखात तिच्या सर्व बारकाव्यांचा परामर्श घेता येणार नाही. त्यामुळे तिच्या काही पैलूंबाबत थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न आहे.
 एखादं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, ठराविक नियमावलीनुसार, एकत्रितपणे काम करणारा समूह म्हणजे संस्था, त्या दोन प्रकारच्या असतात,
१) व्यवस्थापनप्रधान संस्था २) उद्देशप्रधान संस्था

 व्यवस्थापनप्रधान संस्थेत उद्दिष्टांइतकंच किंबहुना काही वेळा त्याहीपेक्षा जास्त महत्त्व अंतर्गत रचना व संस्थेचे नियम यांना दिलं जातं. संस्थेचे कार्य अधिक चाकोरीबध्द असतं. अगदीच आणीबाणीचा प्रसंग आल्याखेरीज नियमांची चौकट

आव्हान ‘बदलांचे/१८