पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/२६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नकोच असे विरोधकांचे म्हणणे आहेया दोन गटांच्या ‘वैचारिक भांडणात' सर्वसामान्यांची अवस्था पंचतंत्रातील दोन गेंड्यांच्या टकरीत सापडलेल्या कोल्ह्यासारखी झाली आहे. यामुळे बदलांची प्रक्रिया लांबणीवर पडून सर्वांचेच अपरिमित नुकसान होत आहे.
 अशा परिस्थितीत या दोन्ही गटांमध्ये देशहिताच्या दृष्टीने व्यापक समझोता होण्याची नितांत आवश्यकता आहे. बदल समर्थकांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, सर्वसामांन्य जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय बदल यशस्वी होणार नाहीत. तर बदल हे होणारच आहेत. ते टाळता येणार नाहीत. बदलांमुळे काही प्रमाणात त्रास होईल, मात्र बदल टोळल्यामुळे त्यापेक्षा जास्त संकटांना तोंड द्यावे लागेल, हे विरोधकांनी ध्यानात घेणे जरूरीचं आहे. हे तत्व केवळ उद्योग क्षेत्रालाच नाही तर सर्वच सामाजिक क्षेत्रांना लागू आहेया दोन्ही गटांच्या सहकार्यावरच आपल्या अर्थव्यवस्थेचं आणि पर्यायाने देशाचं भवितव्य अवलंबून आहे आणि या परस्परविरोधी गटांना एकत्र आणण्याच्या कामात त्या संबंधित क्षेत्रातील ‘व्यवस्थापकांचं’ कौशल्य पणाला लागणार आहे.याबाबत आपण चीनचां आदर्श डोळ्यांसमोर ठेवावयास हरकत नाही. चीनमधील कामगार संघटना आणि सरकार यांच्यातल्या एकोप्यामुळेच तेथे उदारीकरण व खासगीकरणांच्या माध्यमातून आर्थिक क्रांती घडून आली.
 शेवटी मी पुन्हा लेखाच्या सुरुवातीला दिलेल्या माझ्या धरातील संवादाकडे वळतो. तो बदलांचे समर्थक व विरोधक या दोहोंसाठी उद्बोधक आहे. माझ्या घरातील ती अनुभवी स्त्री लग्नाच्या वयाच्या मुलीला जे सांगत आहे, त्यात ‘बध बाई, लग्न हा असा प्रकार असतो. तुला जमेल का ते सर्व? नसेल तर तू आपली लग्नच करू नको. आहेस तशीं सुखी राहा.’ असा उपदेश तिने चुकूनसुध्दा केलेला नाही. उलट ‘या आव्हानाचा तू स्वीकार कर. तो तू मी सांगते त्या पध्दतीने केलास तर अंतिम विजय तुझाच आहे,’ हा आत्मविश्वास त्या मुलीच्या मनात निर्माण केला जातो आहेम्हणजेच तिच्या जीवनात घडू घातलेल्या बदलाचं कसं खुबीदारपणे ‘व्यवस्थापन’ सुरू आहे, ते आपल्या लक्षात येईल.
 अशाचं सामोपचाराची उद्योग, अर्थ, शिक्षण, राजनीती, संरक्षण, शेती इत्यादी सर्वच क्षेत्रांत गरज आहे.या क्षेत्रात झपाट्याने घडणारे व न टाळता येणारे बदल समर्थक व विरोधक यांच्यातील सामंजस्यानेच फायदेशीररीत्या स्वीकारले जाऊ शकतील आणि हे सहकार्य घडवून आणणे हे त्या त्या क्षेत्रातील व्यवस्थापकांसमोरील आव्हान असेल.

अदभुत दुनिया व्यवस्थापनाची/१७