पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/२५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

निर्माण करण्यात आल्या. सार्वजनिक उद्योग, सरकारी उपक्रम (बँका, एलआयसी, इत्यादी) कधीही बंद न पडणारे अशी भावना बनल्यामुळे तेथील नोकरी सुरक्षित मानली जाऊ लागली. एकदा का अशी नोकरी मिळाली की, जन्माची ददात मिटली असा विश्वास निर्माण झाला. मात्र अनेक सरकारी उपक्रम ‘पांढरे हत्ती असल्याचे कालांतराने उघड होऊ लागलं. ते सांभाळणं सरकारला डोईजड झालं. मग गेल्या पंधरा वर्षापासून खासगीकरणाचे धोरण स्वीकारण्यात आलं हा अर्थव्यवस्थेत झालेला मोठा बदल होता. त्या पाठोपाठ आर्थिक उदारीकरण, निबंधमुक्त अर्थव्यवस्था, बहुराष्ट्रीय कंपन्या, आंडवलशाही, बाजारी अर्थव्यवस्था इत्यादी शब्दांचा बोलबाला झाला. मात्र या सर्वांचा सर्वात जास्त परिणाम ज्यांच्यावर होत आहे ते सर्वसामान्य लोक या व्यापक बदलांबाबत अजूनही अज्ञानातच वावरत आहेत. त्यामुळे हे बदल त्यांना भावत नाहीत.
 आमच्या नोकऱ्या जातील, बेकारी वाढेल. आमच्या मुलाबाळांचे काय; असे प्रश्न त्यांना पडतात.बदलांना विरोध वाढतो. म्हणूनच लोकांना बदलांची नेमकी व सत्य माहिती दिली पाहिजे. बदल का करावे लागत आहेत याची कारणे त्यांना समजावून सांगितली पाहिजेत. सुरुवातीला काही समस्या निर्माण झाल्या,तरी दीर्घकालीन विचार करता हे बदल लाभदायक आहेत, हे पटल्यानंतर ते स्वीकारण्याची मानसिकता तयार होईल.
लोकभावनांशी सांगड
 बदलांची लोकांच्या भावनांशी व प्रचलित सवयींशी युक्तीने सांगड घातली गेली तर ते आवडीने व लवकर स्वीकारले जातात. सर्व बदल कायदे करून सक्तीने गळी उतरवता येत नाहीत. रोज आमटीभाकरी खाणायाच हे अन्न कायद्याने बंद केलं आणि त्यांच्यावर श्रीखंडपुरी खाण्याची सक्ती केली तरी तो ती मनापासून स्वीकारणार नाही. उलट ज्या क्षणाला कायदा मोडण्याची संधी मिळेल तेव्हा तो श्रीखंडपुरी फेकून देईल आणि आमटीभाकरीवर तुटून पडेल. कम्युनिस्ट रशियात नेमकं हेच झालं आहे.
 काही वेळा अनिष्ट परंपरा मोडीत काढण्यासाठी बदलांची सक्तीही करावी लागेल. उदाहरणार्थ उद्योग वा कोणत्याही क्षेत्रातला भ्रष्टाचार, पैशाचा अपव्यय, क्रूर सामाजिक परंपरा केवळ अंगवळणी पडल्या आहेत. म्हणून त्या चालू देणे योग्य ठरत नाही. अशा वेळी कठोर धोरण स्वीकारावं लागतं म्हणजेच, बदलांचे व्यवस्थापन करताना पस्थितीप्रमाणे साधकबाधक निर्णय घ्यावा लागतो. आर्थिक व उद्योग क्षेत्रालाही हाच नियम लागू आहे.
दोन्ही पक्षांची जबाबदारी

 भारतात आर्थिक क्षेत्रात बदलांचे वारे वाहू लागल्यापासून बदल समर्थक व बदल विरोधक असे दोन तट पडले आहेत. बदल ताबडतोब हवा असे समर्थकांचे तर बदल

आव्हान 'बदलां'चे/१६