पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/२४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्या क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक व्यवस्थापकाला स्वीकारावं लागतं. हा व्यवस्थापनातील सर्वात नाजूक व निर्णायक टप्पा असतो. तो अत्यंत कौशल्याने हाताळावा लागतो.
 'बदलांची रेल्वेगाडी’ इच्छितस्थळी पोहोचण्यापूर्वी तिला तीन स्टेशनं घ्यावी लागतात. पहिलं, बदलांबाबतचं ज्ञान. दुसरं बदलांबाबतचा विश्वास. तिसरं बदल अंगी बाणणं. या गाडीचा वेग कितीही जास्त असला तरी ही तीन स्टेशनं घ्यावी लागतातच.
 होणारा बदल नेमका काय आहे, याचे ज्ञान प्रथम व्यवस्थापकाला असणं आवश्यक आहे. ज्या गोष्टीची आपल्याला माहिती नसली किंवा असली तरी अर्धवट एकतर्फीं असते, तिला विरोध करण्याची आपली वृत्ती असते. शिवाय कोणताही बदल शंभर टक्के आदर्श किंवा पूर्णपणे फायद्याचा असत नाही. तो आपल्याबरोबर काही दोष तर काही गुण घेऊन येतो. त्यामुळे त्यांचे व्यवस्थापन असतं.
 अलीकडे डंकेल प्रस्ताव, गॅट करार हे शब्द ज्याच्या त्याच्या तोंडी आहेत. त्यांच्या विरोधकांना तुम्ही गॅट म्हणजे काय असे विचाराल तर ते सांगतील, ‘ते आम्हाला माहिती आमचा त्याला कट्टर विरोध आहे. गॅट, डंकेल यामुळे भारतातील नाही, पण उद्योगांमध्ये बरेच बदल होणार आहेत, हे त्यांना माहीत असते. मात्र, या करारांमधील तरतुदी कोणत्या आहेत व त्यांचा फायदा कसा उठवता येईल, याची जाणीव नसल्याने त्यांना विरोध केला जातो.
 याउलट या प्रस्तावांचे समर्थक त्यातील फायद्यांबाबत आपापसांत चर्चा करतात पण सर्वसामान्य जनतेला समजावून सांगत नाहीत. त्यामुळे लोकही अंधारात राहतात. तेव्हा बदल, स्वत: समजून घेणं व त्या बदलांचा ज्यांच्यावर परिणाम होणार आहे, त्या सर्वांना पटेल अशा पध्दतीने व पटेपर्यंत समजावून देणे, हे कुशल व्यवस्थापकाचं पहिलं काम आहे. मी सुरुवातीला दिलेला माझ्या घरातील संवाद हा 'बदल' समजून देण्याचाच उपक्रम आहे.
 त्यानंतरचा टप्पा म्हणजे बदल अंगी बाणणं. बदल केवळ कागदावर किंवा मनात असून उपयोग होणार नाही. तो कृतीत आणला पाहिजे. त्यानुरूप स्वतःची मानसिकता बदलली पाहिजे.

बदल हाताळण्याचे आव्हान :
 बदल घडवून इच्छिणाऱ्यांनी, ज्यांच्यासाठी हे बदल केले जात आहेत व ज्यांच्यावर या बदलांचा सर्वाधिक परिणाम होणार आहे, त्यांच्याशी सुसंवाद साधणे हे पहिली गरज आहे. कोणताही बदल मग तो कितीही आवश्यक व चांगला असला तरी प्रारंभीच्या काळात अडचणीचा वाटतो. असुरक्षिततेची भावना निर्माण होते. उदाहरणार्थ, गेल्या

पन्नास वर्षात भारतात ७५ टक्क्यांहून अधिक नोकऱ्या सरकारी व सार्वजनिक क्षेत्रात

अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/ १५