पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/२३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आपल्याभोवतीचे जग बदलत असते.संत ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे,...‘अगा हे नित्यनूतन देखिजे गीतातत्त्व||’ हे गीतातत्त्व म्हणजे विश्व, नित्यनूतन म्हणजे सतत नवे-अर्थात बदलणारे असते. बालपण, तारुण्य, वृध्दापकाळ या दशा सतत होणाऱ्या बदलांमुळे प्राप्त होत असतात. आपल्यात होणाऱ्या या नैसर्गिक बदलांबरोबर जमवून घेणे नैसर्गिकरीत्याच अंगवळणी पडत.अशा सातत्याने घडणाच्या बदलाला "नित्य बदल असं म्हणतात.

अनित्य बदल
 काही बदल हे ध्यानीमनी नसताना अचानक घडतात.‘हे असं काही घडले असं स्वप्नांतही वाटलं नव्हतं. हे वाक्य आपण अनेकदा उच्चरतो व ऐकतो. हे बदल काही वेळ सकारात्मळ असतात. जसं एखाद्या गरिबाला मोठ्या रकमेची लॉटरी लागणं, तर काही वेळ नकारात्मक असतात. उदाहरणार्थ,कामगारांच्या संपामुळे होणारं उद्योगाचं नुक़सान.
 काही वेळा हे एकदम होणारे बदल सकारात्मक आहेत की,नकारात्मक हे समजण्यास काही काळ जावा लागतो. मी लेखाच्या सुरुवातीला दिलेलं लग्नाच्या मुलीचं उदाहरण पहा. लग्न होऊन मुलगी परक्या घरी जाणं हा मुलीच्या व ती ज्यांच्या घरात जाते त्यांच्या जीवनात अचानक झालेला बदल असतो. पण तो सकारात्मक की नकारात्मक हे त्या विवाहाच्या यशावर किवा अपयशावर अवलंबून असतो. अशा बदलांना अनित्य बदल म्हणतात.

बदलांचे व्यवस्थापन
 उद्योग,राजकारण,अर्थव्यवस्था,प्रशासन आदी क्षेत्रेही या बदलांपासून अलिप्त नसतात. या क्षेत्रात घडणारे अनित्य बदल व्यक्तिगत आयुष्यातील बदलांपेक्षा जास्त गुंतागुंतीचे व कित्येकदा निर्माण करणारे असतात. समाजाची प्रदीर्घ काळ बसलेली घडी या बदलांमुळे विस्कटते. कित्येकांची जीवनशैली बदलते. कित्येकदा 'नको तो बदल,पूवींचंच बरं होतं’ असं वाटू लागतं. बदलाला विरोध करण्याची वृती बळावते. तरीही ते टाळता येत नाहीत.
 अशा परिस्थितीत बदलांचे तोटे कमीत कमी राखून जास्तीत जास्त फायदा करून घेणे व हे करताना बदलाला विरोध करणाऱ्यांनीही विश्वासात घेणं यालाच ‘बदलांचे व्यवस्थापन म्हणतात.
 काही वेळा या बदलांशी आपण जमवून घेणं,काही वेळा बदलांना आपल्याशी जमवून घ्यायला लावणं, काही वेळा आपण स्वतःच बदल घडवून आणणं आणि अशा

तच्हेने आपण काम करत असलेल्या क्षेत्रांसाठी त्याचा फायदा करून घेणं हे आव्हान

आव्हान 'बदलां'चे/ १४