पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/२३३

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

व्यवस्थापकीय सल्लागर आणि संस्था


अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf

वस्थापकीय सल्लागार' हा व्यवसाय गेल्या दोनअडीच दशकांत चांगलाच भरभराटीला आला आहे. व्यवस्थापनशास्त्रातील अनेक मान्यवर तर या व्यवसायात आहेतच. शिवाय बऱ्याच व्यवस्थापकांनी आपली नोकरी सोडून हा व्यवसाय पत्करला आहे. उद्योगाचं यश केवळ गुंतवणूक, उत्पादन, कर्मचारी व ग्राहक एवढ्यावरच अवलंबून नसून या घटकांच्या उत्कृष्ट व्यवस्थापनावर निर्भर आहे, हे लक्षात आल्यापासून

बहुतेक सर्व मध्यम व मोठे उद्योग स्वतंत्र व्यवस्थापकीय सल्लागारांचे सहकार्य वाढत्या प्रमाणात घेऊ लागलेले आहेत. या व्यवसायाविषयी मागच्या एका लेखात आपण काही माहिती करून घेतलेली आहे. प्रस्तुत लेखात ‘व्यवस्थापकीय सल्लागार व्यवसायात सल्ला घेऊ इच्छिणाऱ्यांची भूमिका व त्यांच्या अपेक्षा’ या महत्त्वाच्या विषयाचा विचार करणार आहोत. याचा फायदा सल्ला व्यावसायिक व त्यांचे ग्राहक अशा दोघांनाही होण्याची शक्यता आहे.
 यापैकी तंत्रज्ञानविषयक मार्गदर्शनाची आवश्यकता सातत्याने लागत नाही. कारण एकदा यंत्रसामुग्री आणून बसवली की कित्येक वर्षे ती बदलावी लागत नाही. मात्र, संस्थेची संरचना, ती चालविण्याची पध्दती आणि त्या निमित्तानं निर्माण होणारे व्यावसायिक संबंध याबाबत नेहमी मार्गदर्शनाची आवश्यकता असते. कारण संस्थेमधील अंतर्गत व बाह्य वातावरण सुयोग्य ठेवण्यासाठी या तीन बाबी महत्त्वाच्या असतात. त्यामुळं त्यांच्यावर सतत लक्ष ठेवणं आणि जागरूक राहणं आवश्यक असतं. व्यवस्थापकीय मार्गदर्शकाला इथंच महत्त्वाची भूमिका बजावायची संधी मिळत.
 संस्थेची संरचना म्हणजे नेमकं काय हे पाहणंही आवश्यक आहे. उत्पादन व त्याची विक्री यांना आधारभूत बाबी म्हणजे संरचना. उदाहरणार्थ संस्थेला पैसा पुरविणारे स्त्रोत, कच्चा माल पुरविणारे स्रोत, संस्थेत तयार होणाऱ्या मालाची विक्री करणारी व्यवस्था, हिशेबी व्यवस्था व तो तपासणारी व्यवस्था या सर्वांचा समावेश ‘संरचने'त होतो.
संस्थेची स्थिती व मार्गदर्शन:

 मार्गदर्शक कोणता सल्ला देणार हे संस्थेच्या सद्य:स्थितीवर अवलंबून असू शकतं. संस्था तीन प्रकारच्या असू शकतात -

व्यवस्थापकीय सल्लागार अणि संस्था/२२४