पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/२३१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तेथे गेलेल्या भारतीयांनी स्वतःच्या हिकमतीवर व्यवसाय उभारले आणि त्या देशात रोजगार निर्मिती केली. अमेरिकेतील सॉफ्टवेअर व्यवसाय आज भारतीयांच्या व्यावसायिकतेवर सर्वस्वी अवलंबून आहे.
असं का घडतं? :
 स्थानिक आणि स्थलांतरित यांच्यामधल्या आर्थिक शर्यतीत स्थलांतरितांनी बाजी मारलेली जगभर दिसून येते. असं का होंतं तर स्थलांतरित हे काम करणं आणि पैसा मिळविणं या एकाच मुख्य उद्देशानं आपलं मूळ स्थान सोडून आलेले असतात. त्यामुळं त्यांची मानसिकता पडेल ते काम करण्याची असते. या उलट स्थानिक हे निरुत्साही आणि काहीसे आळशी असतात. स्पर्धेत उतरण्यापेक्षा स्वतःच्या सुरक्षित आसऱ्यांंमध्ये राहणं ते पसंत करतात. आपण येथील मूळ नागरिक आहोत, आपल्याला येथून कोणी हलवू शकत नाही या भावनेनं ते वावरतात. स्वतःची सुरक्षितता त्यांनी गृहीत धरलेली असते. त्यामुळं त्यांना एक प्रकारचं जाड्य किंवा मंदपणा येतो. साहजिकच ते मागं पडतात. ‘सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट’ हा नियम तिथं लागू पडतो.
 काही वर्षांपूर्वी मी केरळला गेलो होतो. तेथील एका स्थानिक उद्योजकानं मला विचारलं, ‘माझ्या कंपनीसाठी आपण एखाद्या महाराष्ट्रीयन अकौंटंटचे नाव सुचवू शकाल का?' मला आश्चर्य वाटलं. ‘अहो, केरळमधले अकौटंट मुंबईत येऊन कामं मिळवतात आणि तुम्हाला केरळमध्ये महाराष्ट्रीयन अकौटंट हवाय? केरळमध्ये कोणीच अकौंटंट उरला नाही का? ’ मी विचारलं. तसं नव्हे, पण इथले स्थानिक अकौटंट आळशी आहेत. कामापेक्षा त्यांच्या अटीच जास्त असतात म्हणून विचारलं.' तो म्हणाला. या उदाहरणावरून माझा मुद्दा स्पष्ट होईल.
 मी स्वत: मूळचा कोकणातील असल्यानं कोकण रेल्वेबाबत खूपच आशावादी होतो. या प्रकल्पामुळे स्थानिक लोकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील अशी माझी समजूत होती, पण एकदा कोकण रेल्वेतून प्रवास करताना मला आढळलं की, महाराष्ट्रातल्या प्रत्येक स्थानकावरील हॉटेलं आणि बुकस्टॉल्स `बाहेरचे’ विशेषतः उडपी लोक चालवताहेत.मी एका स्थानिकाला विचारलं, 'हे स्टॉल्स तुम्ही का नाही चालवत?' तो म्हणाला, `चालवले असते पण रेल्वे या स्थानकावर रात्री १ वाजता गाडी येते. त्यावेळी आम्ही गाढ झोपेत असतो. मग स्टॉल कसा चालवणार?' मी म्हटलं, ‘पण दुपारी अडीच वाजताही एक गाडी येते.'
 'हो, पण ती आमची दुपारच्या झोपेची वेळ असते,' तो सहजपणे उत्तरला.
 अशा स्थितीत बाहेरच्यांनी ‘आक्रमण केलं तर दोष त्यांना देता येईल का?

कोकणाच्या बाबतीत बोलायचं तर आळशीपणावर मात करून मेहनत करण्याची वृत्ती

स्थलांतर : शाप की अपराध? / २२२