पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/२१९

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


अशा एका व्यवस्थापकाची व्यथा त्याच्याच शब्दांत पाहा.
 मी कंपनीत कार्यव्यवस्थापक होतो. तेथे कर्मचाऱ्यासंबंधी काही समस्या निर्माण झाल्या. गैरवर्तन करणाच्या कर्मचाऱ्यांंविरूद्ध कठोर कारवाई करावी अशी सूचना मी केली. मात्र यामुळंं कर्मचारी संपावर जाऊन उत्पादनावर परिणाम होईल आणि त्याचा फायदा प्रतिस्पर्धा कंपन्या उठवतील असं वाटल्याने व्यवस्थापनाने माझी सुचना नाकारली. त्यामुळे माझ्यावर अवलंबून असणाच्या सहकार्यांमध्ये माझी नाचक्की झाली. त्यांच्या दबावामुळे मला व्यवस्थापनाशी या विषयावर वाद घालावा लागला त्यांनी मला नोकरी सोडण्याची सूचना केली. पण घरच्या समस्यांमुळे तस करणंं अशक्य होतं. अपमान सहन करून नोकरी टिकवणंं भाग होतं’
कामातून समाधान न मिळणं :
 "कित्येकदा कामातून पैसा मिळाला तरी मानसिक समाधान मिळेलच असं सांगता येत नाही. 'जॉब सॅटिसफॅक्शन' मिळाल्याखेरीज काम केल्यासारखंं वाटत नाही. व्यवस्थापकानं मला सांगितलं, ‘मी कामाला सुरुवात केली तेव्हा पगार व स्टेटस याबाबत मी समाधानी होतो. काही वर्षांनंतर मला सारखं या कामावरून त्या कामावर हलविण्यात येऊ लागलं. कोणत्याही प्रकल्पावर एक वर्षांच्यावर मला टिकवण्यात येत नसे. मी सादर केलेल्या अहवालचंं कौतुक होत असे पण त्यांची अंमलबजावणी झालेली दिसत नसे.त्यामुळंं आपण वेळ आणि बुद्धिमत्ता वाया घालवत आहोत असं वाटून मी अस्वस्थ होई अपेक्षेइतका पगार असूनही कामातून समाधान मिळत नसे.'

 वरील उदाहरणांचं तात्पर्य असं की, कर्मचाच्यांची संख्या कमी करण्याचंं धोरण, व्यवस्थापकाची प्रतिष्ठा, कामाचे स्वरूप, वातावरण, समाधान अशा अनेक बाबी नोकरी सोडावी लागण्यास ठरतात. अशा स्थितीत व्यवस्थापकानंं काय करावं हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आपल्या नोकरीकडं स्थितप्रज्ञ दृष्टीने आणि त्रयस्थ भावनेने पाहिल्यास यातील बऱ्याच समस्या सुटू शकतात. ही दृष्टी कशी विकसित करावी याबद्दल पुढील लेखात पाहू.

नोकरीबाबत स्थितप्रज्ञ राहा/ २१०