पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/२२०

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

स्वतःच्या कंपनीला 'ओळखा'


अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf

र्मचारी संख्येत कपात, कपन्यांचं विलीनीकरण, अनुकूल वातावरणाचा अभाव, आपल्या कार्यक्षमतेनुरूप काम न मिळणं, कामातून समाधान न मिळणं, वरिष्ठ अधिकाऱ्यांशी मतभेद इत्यादी अनेक कारणांस्तव नोकरी सोडण्याची पाळी कर्मचारी किंवा व्यवस्थापकांवर येऊ शकते. सध्याच्या जलदगतीने बदलणाच्या आणि त्यामुळे काहीशा असुरक्षित व अस्थिर औद्योगिक वातावरणामुळे ही कारणं अधिकच धारदार झाली आहेत.त्यामुळं नोकरीकडे त्रयस्थ दृष्टिकोनातून पाहणं आणि तीत भावना गुंतवण्यापेक्षा व्यवहारी पध्दतीनं विचार करून धोरण ठरवणं हा यावर उपाय आहे हे मागच्या लेखात आपण पाहिलं आहे. हा उपाय अमलात नेमका कसा आणायचा याचा आढावा या लेखात घेऊ.

 चालू नोकरी जाण्याची शक्यता असलेल्या व्यवस्थापकाने ती बदलण्याचा विचार काळजीपूर्वक व पध्दतशीर केला पाहिजे. कोणत्याही प्रसंगांला तोंड देण्याची सुरुवात काही वर्ष अगोदरपासूनच करावयास हवी. वर्षातून एकदा तरी आपल्या स्थितीचं समालोचन केलं पाहिजे. समालोचन म्हणजे टीकात्मक पध्दतीने पाहणं, गुणदोषांचा अभ्यास करणं. याच्या तीन पायच्या आहेत.
 १. आपल्या कंपनीचं समालोचन
 २. आपल्या भोवतीच्या परिस्थितीचं समालोचन
 ३. आपल्या कामाचं समालोचन
कंपनीचं समालोचन:

 आपण योग्य कंपनीसाठी काम करीत आहोत का? हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे. ‘योग्य कंपनी’ची व्याख्या करणं सोपं नाही. पण अयोग्य कंपनी कोणती हे ओळखणं सोपं आहे. कंपनीच्या गुणदोषांचा अभ्यास केल्यास आपण योग्य कंपनीसाठी काम करत आहोत की अयोग्य यांचा अचूक अंदाज येतो. मग काम सोडण्यासाठी दीर्घकालीन योजना बनविणं शक्य होतं. अयोग्य कंपनी ओळखण्यासाठी पुढील 'टीप्स'

अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/२११