पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/२१८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

व्यवस्थापन आणि सेवाभाव


कदा मी रेल्वेने दूरच्या प्रवासाला निघालो होतो. प्रत्येक जंक्शनवर एक झाडूवाला येऊन आमचा फस्टक्लासचा डबा स्वच्छकरीत असे.डब्यातले प्रवासी त्यांच्याशी अत्यंत उर्मटपणे वागत. झाडूवाला झाला म्हणून काय झालंं त्याच्याशी आपण चांगलंच वागलं पाहिजे असं मला वाटू लागलं. पुढच्या जंक्शनवर मी डब्यातून उतरलो. जवळून जाणाच्या झाडूवाल्याला म्हणालो आमचा डबा स्वच्छ करून देशील का?’त्यानं माझ्याकडे पाहिलं आणि एकदम प्रश्न केला,‘आपल्याजवळ तिकीट आहे का?’

 ‘असं का विचारता?’.मी त्याला म्हटलं.
 ‘आम्ही कामगार माणसं. फस्टक्लासमधील श्रीमंत माणसं आम्हाला घालून पाडून बोलतात. आपण मला विनंती केलीत. मला वाटल आपण माझी चेष्टा करताय, मी आपल्याला तिकीट विचारलं.’ तो उत्तरला.
 आपल्याकडे कामांची ‘हलकी कामं’ आणि ‘प्रतिष्ठेची कामं' अशी विभागणी आहे. तथाकथित हलकी कामे करणाच्यांचा अपमान करायचा, त्यांना त्यांच्या पायरी ची सतत जाणीव करून द्यायची, हा स्वतःचा अधिकार आहे असं उच्चभ्रू माणसंं समजतात. आणि अशी कामं करणार्यांच्याही ते इतकं अंगवळणी पडलेलं असतं की एखाद्यानं त्यांची मृदू भाषेत विचारपूस केली तरी त्यातून ते दुसरा अर्थ काढण्याची शक्यता असते.
 दुसरा एक प्रसंग सांगतो मी एका पंचतारांकित हॉटेलच्या स्वागतकक्षात उभा होतो. आजूबाजूला अनेक भारतीय आणि परदेशी अतिथी होते. माझ्या लक्षात आलं की तिथल्या रिसेप्शनिस्ट विदेशी अतिथींचं आगतस्वागत जास्त चांगल्या प्रकारे करीत आहेत. भारतीय पाहुण्यांकडे मात्र त्यांचंं दुर्लक्ष होताना दिसलं. एका रिसेप्शनिस्टला मी विचारलं, ‘भारतीय आणि परदेशी पाहुण्यांमध्ये तुम्ही असा पक्षपात का करता?

 ‘आमच्या व्यवस्थापकाला सांगणार नसाल तर सांगते. भारतीय पाहुण्यांना चांगल्या आतिथ्याची किंमत नसते. याउलट परदेशी पाहुणे आमचे स्वागत तितक्याच सभ्यतेनंं आणि मृदूपणानं स्वीकारतात. साहजिकच आमचे लक्ष विदेश अतिथींकडंं अधिक

व्यवस्थापन आणि सेवाभाव / २००