पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/२०५

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


आहे का?
 केवळ एक व्यक्ती विवक्षित ठिकाणी जन्माला आली म्हणन ती त्या ‘जागेची’ आणि ती जागा 'तिची’ असं समजण्यात काही अर्थ आहे का? अर्थात हे प्रश्न आजच पडताहेत असंं मात्र नव्हे. शेकडो वर्षांपूर्वी संत ज्ञानेश्वरांनी 'हे विश्वची माझे घर' असं सांगून ठेवलं आहे, आणि ‘सब भूमी गोपालकी' ही म्हण तर सुपरिचित आहे. तरीही दुसच्याचा प्रदेश जिंकणं हे संपत्तीची हाव भागविण्यासाठी आणि आर्थिक विकासासाठी आवश्यक असल्यानं शतकामागून शतकं या भिंती आणि त्यामळे होणारी युध्द टिकून आहेत. अगदी गेल्या शतकापर्यंत इतर देश जिंकून तेथे वसाहती निर्माण करणं, हे अनेक देशांच्या सरकारांचं प्रमुख धोरण होतं.
 गेल्या पन्नास वर्षांत परिस्थिती बदलत गेली. दुसऱ्या महायुध्दानंतर, एकेकाळी सूर्य न मावळणारं ब्रिटिश साम्राज्य लयाला गेलं. त्यानंतर अनेक राष्ट्राच्या वसाहती स्वतंत्र झाल्या.
 दुसऱ्याला लुटून आणि त्याचा प्रदेश बळकावून मिळालेली श्रीमंती फार काळ टिकत नाही हे कालांतराने माणसाच्या लक्षात आलं. इतिहासावर नजर टाकली असता असं आढळतं की, लूटमार आणि शोषण यावर अवलंबून असणाऱ्या राष्ट्रांची अर्थव्यवस्था कोलमडते. त्यामुळं आर्थिक विकासाचा हा मार्ग नव्हे हे कळून चुकलं. यासंबंधी अमेरिकेचं उदाहरण पाहा. गेली २०० वर्षे सतत प्रगती करणारा हा देश आहे,पण त्यानं युध्द करून कुठला प्रदेश जिंकला आणि सीमाविस्तार केला असं काही पहावयास मिळत नाही. काही देशांवर अमेरिकेनं सैनिकी कारवाई केली, पण ते देश स्वतःच्या भूमीला जोडले नाहीत. त्यामुळे दोनशे वर्षांपूर्वी त्या देशाच्या सीमा जशा होत्या, तशा त्या आजही आहेत. तरीही तो देश अधिकाधिक समृध्द होत आहे.म्हणजेच सीमाविस्तार करून नव्हे, तर व्यापाराच्या माध्यमातून अधिक समृद्ध मिळविला येते, हे लक्षात आल्यानंतर प्रदेश किंवा भूमी ताब्यात ठेवण्यापेक्षा व्यापार ताब्यात ठेवणं, त्याचं संरक्षण करणं याकड लक्ष केंद्रित केले जात आहे.

 सध्याच्या काळात निर्यात वाढविणं व आयात कमी करणं हा मार्ग आर्थिक विकासासाठी चाेखाळला जात आहे. मात्र अशा पध्दतीचा असमतोल व्यापार फार काळ टिकू शकत नाही. कारण जसजसा एखादा देश अधिकाधिक समृध्द होऊ लागतो , तशी त्याच्या चलनाची किंमत,अन्य देशांच्या चलनांच्या तुलनेत वाढत जाते. त्या देशातल्या सेवा महाग पडणारी कामं ज्या देशात स्वस्त पण सक्षम श्रमशक्ती उपलब्ध आहे,अशा देशांमधून करून घ्यावी लागतात. याला आऊटसोर्सिंग म्हणतात. पर्यायानं त्या

सीमाविरहित जगातील व्यवस्थापन/२०४