पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/१७८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नूतन सहस्त्रकातील आव्हानं


हिल्या दोन सहस्रकातील सामाजिक घडामोडी आणि त्यातून निर्माण झालेली स्त्री-पुरुष समानता, लोकशाही आणि भांडवलशाही ही त्रिसूत्री याचा परामर्श आपण मागच्या लेखात घेतला. याच त्रिसूत्रीच्या आधारावर आपल्याला तिसऱ्या सहस्रकात वाटचाल करायची आहे.

तिसरे सहस्रक:
 पहिल्या सहस्रकात सातत्यानं घडलेल्या लष्करी संघर्षामुळं समाजातील बुध्दिमान व पराक्रमी तरुणांचा कल लष्करांकडे होता. दुसऱ्या सहस्रकात जगात अनेक ठिकाणी मोठमोठी साम्राज्ये स्थापन झाल्याने त्यांचा कारभार हाताळण्यासाठी प्रशासकीय क्षेत्रात बुद्धिमान व्यक्तींची गरज निर्माण झाली. साहजिकच समाजातील बौध्दिक प्रतिमा त्याकडे आकर्षित झाली. तर तिसच्या सहस्रकात माणसाचं रूपांतर ‘आर्थिक प्राण्या'त झाल्यानं उद्योग व व्यवसाय यांना राजकारणापेक्षाही अधिक महत्व प्राप्त झालंं आहे. त्यामुळं 'व्यवस्थापन'क्षेत्राला अनन्यसाधारण महत्व मिळतं आहे. याचा परिणाम लष्कर, नोकरशाही आणि व्यक्तिगत व्यवसाय यांच्यावर होणं अपरिहार्य आहे.
 या सहस्त्रकाच्या सुरुवातीपासूनच अमेरिका ही एकमेव महाशक्ती उरली आहे.त्याचप्रमाणं संयुक्त राष्ट्रसंघही विविध देशांमधील परस्पर संघर्षांमध्ये लक्ष घालून जागतिक पोलिसांची भूमिका बजावत आहे.त्यामुळं ‘राष्ट्रीय लष्कर'ही संकल्पना मागे पडत आहे.युध्दांची संख्या खुप कमी झाली आहे. लष्करांचा उपयोग दुसऱ्या देशांशी लढण्यासाठी ना होता, स्वतःच्याच देशातील कायदा आणेि सुव्यवस्था टिकविण्याकरिता अधिक होत आहे. मात्र हे काम खास प्रशिक्षित पोलिसांकडून अधिक चांगल्या प्रकारे व कमी खर्चात करून घेता येतं,हे अनेक देशांच्या लक्षात आलं आहे.अशा खास पोलीस दलांना वायुदालाचं पाठबळ दिल्यास तेवढे पुरेसं आहे,लष्कर असण्याची आवश्यकता नाही असा विचार मांडला जाऊ लागला आहे. तो या सहस्त्रकात मूळ धरण्याची शक्यता आहे.

 साम्राज्यांची स्थिरता, विस्तार व विकासामध्ये प्रशासकीय नोकरशाहीनं महत्त्वाची

अद्भूत दुनिया व्यवस्थापनाची/१६९