पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/१७७

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


अंमलात येऊ शकत नाही. सध्याच्या आधुनिक मानवी संस्कृतीत हुकूमशाही ही रानटी व मध्ययुगीन संकल्पना मानली जाते.साहजिकच अशा कालबाह्य राज्यपध्दतीत आसरा शोधणारा साम्यवाद कोणालाच नकोसा झाला आहे.हुकुमशाही अधिक साम्यवाद या मिश्रणापेक्षा लोकशाही अधिक भांडवलशाही हे मिश्रण आधुनिक मानवाला जास्त स्वीकारार्ह वाटतं. साम्यवाद अधिक लोकशाही असं मिश्रण असूच शकत नाही.
 भांडवलशाहीत ‘उद्योजकता' या संकल्पनेचा विकास होत गेला. त्यामुळे असंख्य नवे उत्पादन व सेवाव्यवसाय निर्माण झाले.विविध उद्योजकांमधील मुक्त स्पर्धेमुळे उत्पादकता,उत्पादनांची गुणवत्ता आणि नवनिर्मितीला प्रोत्साहन मिळालं.याचा परिणाम म्हणून आर्थिक विकास वेगाने होत गेला. बहुतेकांचं जीवनमान सुधारल.
 दुसऱ्या सहस्स्त्राकानं पुरुष विरुध्द स्त्री या आणखी एका विश्वरूपी सामाजिक संघर्षाचा निकाल लावला.नंतर शिकार करणं, शेती व लढाया यांचे प्रमाण वाढले. ही कामं शारीरिक शक्तीच्या जोरावर करावी लागत असल्याने महिला मागे पडल्या व पुरुषाचं प्रथम कुटुंबावर व नंतर समाजावर वर्चस्व वाढलं. पण दुसऱ्या सहस्रकाच्या उत्तरार्धात पुन्हा आपल्या कोशातून बाहेर पडू लागल्या असून जवळजवळ सर्वच क्षेत्रांत पुरुषाच्या बरोबरीने उभ्या आहेत. यंत्रयुग व संगणकयुग अवतरल्यामुळे उत्पादनासाठी शारीरिक शक्तीवर अवलंबून राहावे लागत नाही. असा पंक्तीप्रपंचत्यामुळे पुरुषांची कामं वेगळी आणि महिलांची वेगळी असा पंक्तीप्रपंच बाजूला पदाला आहे.स्त्री शक्ती जागृत झाली असून ती समानतेची मागणी करीत आहे आणि ती अमान्य अशक्य आहे.
 अशा पध्दतीनं स्त्री-पुरुष समानता, भांडवलशाही आणि लोकशाही ही त्रिसुती हाती घेऊन आपण तिसर्या सहस्रकात नुकताच प्रवेश केला आहेया त्रिसूतत्रीला विरोध करणाच्या शक्ती अजूनही अस्तित्वात आहेत. तथापि, त्यांचा बीमोड या सर्व पहिल्या काही दशकांत होणार आहे.

 या शतकातील औद्योगिक व इतर क्षेत्रातील व्यवस्थापनावरही या त्रिसूत्रीचा प्रभाव पड़णं अनिवार्य आहे. या पाश्र्वभूमीवर सहस्रकातील व्यवस्थापनासमोरचाी आवाहने कोणती आहेत व त्यांचा सामना कसा करावा लागेल याचा विचार पुढील लेखात करूंं.

नूतन सहस्रकातील व्यवस्थापन/१६८