पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/१७९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

भूमिका बजावली आहे.तिचा पाया मुख्यत: तुर्की व चिनी सम्राटांनी घातला. नंतर इतर देशांनी तिचंं अनुकरण केलं. युरोपियन देशांनी जग पादाक्रांत केल्यानंतर अनेक ठिकाणी वसाहती स्थापन झाल्या. त्यांच्या कारभारासाठी खास पध्दतीची नोकरशाही निर्माण केली.
 दुसच्या महायुध्दानंतर अनेक देश युरोपियन देशांच्या जोंंखडातून स्वतंत्र झाले.त्यांनीही विकास गतिमान करण्यासाठी याच प्रशासकीय नोकरशाहीचा आधार घेतला. मात्र, हा प्रयोग अयशस्वी ठरल्याचं आणि नोकरशाहीवर भर देऊन विकास साधता येत नसल्याचं लक्षात आल्यानं दुसच्या सहस्रकाच्या अखेरीस सरकारांनी खासगीकरणावर भर देण्यास सुरुवात केली. हीच प्रक्रिया तिसऱ्या सहस्त्रकात कायम राहणार आहे. याचा अर्थ असा की, नोकरशाहीचंं वर्चस्व नाममात्र राहणार असून खासगी व्यवस्थापनालाच महत्त्व प्राप्त होणार आहे. डॉक्टर्स, आर्किटेक्ट्स, वकील इत्यादी खासगी व्यवसायिकांनिही आता व्यवस्थापनाचं महत्त्व जाणून घेतलंं असून आपापले व्यवसाय केवळ व्यक्तिगत बुध्दिमत्ता व कौशल्याच्या आधारावर चालू न ठेवता, अधिक ‘व्यावसायिक' पध्दतीने कसे चालविता येतील याकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे.साहजिकच त्यांनाही व्यवस्थापन व व्यवस्थापकांची गरज भासणार आहे.
 अशा तऱ्हेनंं तिसऱ्या सहस्त्रकात लष्कर,नोकरशाही आणि सरकार यांचे अधिकार कमी होऊन जग चालविण्याची जबबादारी प्रशिक्षित व्यवस्थापन तज्ज्ञांवर येऊन पडणार आहे.
तिसऱ्या सहस्रकातील आव्हानं :
 व्यवस्थापनाच्या रुंदावणाच्या कार्यकक्षांमुळंं हे क्षेत्र व व्यवस्थापक यांचासमोर पुढील दोन आव्हानं उभी राहणार आहेत.
गरीब वर्गाचे आव्हान :

 समाजावर नेहमीच ‘सक्षम अल्पसंख्याकां'ची सत्ता असते. याचा सरळ अर्थ असा की,सत्ताधाऱ्यांची संख्या कमी असते, पण त्यांची ताकद व अधिकार अधिक असतात.त्यामुळं त्यांचा संख्येनंं मोठ्या पण फारसे अधिकार नसणाऱ्या समाजाची संघर्ष होण्याची शक्यता असते.अगदी लोकशाहीतदेखील सरकारची ताकद समाजापेक्षा मोठी असते. जगात व्यवस्थापन करताना व्यवस्थापकांनाही हाच अनुभव येणार आहे.व्यवस्थापकांची संख्या कमी, पण अधिकार अधिक तर ज्यांचं व्यवस्थापन करवयाचं त्यांचे अधिकार कमी पण संख्याबळ प्रचंड असा सामना रंगणार आहे, अशा सत्ताहीन पण संख्याबळ अधिक असणाच्या बहुजन समाजात मजूर, भूमिहीन शेतमजूर, कष्टकरी, असंघटित कामगार इत्यादींचा समावेश असतो. त्यांचं नेतृत्त्व करणारा एक वर्ग असतो.

नूतन सहस्रकातील आव्हानंं/१७०