पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/१७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मालकाबद्दल वाटणारी भीती

का प्रसिध्द औद्योगिक कुटुंबाच्या मालकीच्या कारखान्याचा ‘व्यवस्थापकीय सल्लागार` म्हणून मी काही वर्षांपूर्वी काम पाहत होतो. त्यावेळी घडलेला एक गंमतीशीर पण व्यवस्थापनाच्या दृष्टीने अत्यंत बोधप्रद असा प्रसंग सांगतो.

 हा कारखाना शहरापासून दूर होता.मालक त्याला वर्षानुवर्षे भेट देत नसत.एकदा काही कामानिमित्त मला कारखान्याच्या गेस्ट हाऊसमध्ये मुक्काम करावा लागला. आता मी मालकांचा सल्लागार म्हणून मला मालक ज्या खोलीत उतरत ती खास ‘पंचतारांकित`खोली देण्यात आली होती.‘वॉश'घेऊन प्रवासाचा शीण घालवावा, म्हणून मी खोलीच्या बाथरूममध्ये प्रवेश केला,आणि चक्रावूनच गेलो.बाथरूममध्ये एक-दोन नाही तर चांगले सात उत्तमोत्तम साबण माझ्या स्वागतांला सज्ज होते. त्यात लक्स इंटरनॅशनलपासून सिंथॉलपर्यंत सर्व प्रकार होते. मी कायम आंघोळच करीत राहावं असं या लोकांना वाटतं की काय, अशी शंका माझ्या मनाला चाटून गेली. नंतर मी गेस्ट हाऊसच्या व्यवस्थापकाला विचारलं, "का हो, बाथरूममध्ये इतके साबण कशासाठी ठेवलेत?"

 तो म्हणाला, “काय सांगू साहेब, मालक येथे येतात,तेव्हा याच खोलीत उतरतात, पण त्यांच्या आवडीचा साबण कोणता, ते मला ठाऊक नाही. त्यामुळे उगाच भानगड नको, म्हणून मी..."
 “अरे, पण तुम्ही मालकांना विचारायचं त्यांच्या आवडीच्या साबणाबाबत."

 “छे, छे तसं कसं साहेब,ते मालक, आम्ही नोकर!

मालकाबद्दल वाटणारी भीती/८