म्हणून घेते. त्यांचा देशाभिमान जागृत करण्याचा प्रयत्न करते. ही मुले मोठी होतील,
तेव्हा त्यांना देशाबद्दल गर्व वाटेल आणि त्यातील काही जण तरी देश सुधारण्याचा
प्रयत्न करतील."
बाईंंचं उत्तर ऐकून मी भारावून गेलो. मला वाटलं, ‘या शिक्षिकेला ‘व्यवस्थापन'
म्हणजे काय ते नेमकं उमजलं आहे. तिला व्यवस्थापनशास्त्राच्या तीन मूलभूत तत्त्वांची
जाण आहे. ही तत्त्वं कोणती? तर
१) आपल्यावर असणाऱ्या जबाबदारीची अचूक जाण व ती पूर्ण करण्यासाठी
स्वतःला वाहून घेणे.
२) आपली शक्तिस्थाने वा साधनस्त्रोत नेमके ओळखण्याची कुवत आणि सर्वात
महत्त्वाचे म्हणजे खरा स्त्रोत आपण स्वतःच आहोत हे जाणणे.
३) आपल्या साधनस्त्रोतांचा कल्पकतेने आणि प्रयोगशील वृत्तीने वापर करणे.
देश सुधारणं ही आपली जबाबदारी आहे,याची जाण या शिक्षिकेला आहे. विद्यार्थी
तिचा साधनस्त्रोत आहे आणि या साधनस्रोतावर ती कल्पकतेनं प्रयोग करीत आहे.
आपण सर्व जण ज्या 'पाण्यात' आहोत, त्याच पाण्यात ही शिक्षिकाही आहे.
पाण्याचा दबाव तिच्यावरही आहे. तिलाही तिच्या तत्त्वाविरुध्द काही अनिवार्य तडजोडी
कराव्या लागत आहेत, आणि तरीही तिची ध्येयपूर्तीकडे योजनाबध्द रीतीने अहर्निश
वाटचाल सुरू आहे. व्यवस्थापन महर्षि पीटर ड्रकर म्हणतात, "नियोजनपूर्वक काम
कराल तर ध्येयापर्यंत नाही तर निदान त्याच्या जवळपास नक्कीच पोहोचाल, पण
योजनाबध्दता नसेल, तर ध्येयपूर्ती दृष्टिपथातही येणार नाही. परिणाम मात्र भोगावे
लागतात."
तात्पर्य, प्रवाहपतित ओंडक्याकडे (वरचंं) स्थान आहे, पण त्याच्यापाशी बळ नाही. याउलट मासा क्वचित पाण्याच्या पृष्ठभागावर दिसतो. पण पाणी कापत कापत स्वतःचा मार्ग आक्रमिण्याची शक्ती आणि संधी त्याच्याजवळ आहे.