पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/१६६

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

व्यवस्थापकाचे गुणधर्म

अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf

ना सहकार नही उध्दार'हे घोषवाक्य आपल्या चांगल्याच परिचयाचं आहे. सहकारी तत्त्वावर स्थापन करण्यात आलेले उद्योग भारतात अनेक आहेत. पण डॉ. कुरियन यांनी नावारूपाला आणलेला ‘अमूल दुग्ध उद्योगा'ने हे घोषवाक्य खऱ्या अर्थाने सार्थ ठरविलंं आहे. ‘अमूल उद्योग' गुजरातच्या आणंद जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कायापालटाला कारणीभूत ठरला आणि या उद्योगाच्या यशाला कारणीभूत ठरलं ते कुरियन यांचं समर्पित व्यवस्थापन. या लेखात आपण कुरियन यांच्याविषयी माहिती करून घेणार आहोत.‘व्यवस्थापन’ क्षेत्रात भरीव कामगिरी करून स्वतःचा ठसा मार्गदर्शक ठरू शकते.

 काही दशकांपूर्वी अमूल'च्या पशुखाद्य कारखान्याचे उद्घाटन करण्यासाठी दिवंगत पंतप्रधान लालबहादूर शास्त्री आले होते.अमूलचा परिसर आणि या उद्योगामुळंं या भागात घडलेलं आमूलाग्र परिवर्तन पाहून ते अक्षरशः थक्क झाले.कुरियन यांच्याशी विचारविमर्ष करून त्यांनी या यशाचं रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला. कुरियनही त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलले.मात्र तरीही शास्त्रीजींच समाधान झाल नाही.शंका राहूनच गेल्या.

 शास्त्रीजी त्यांना म्हणाले, “आपल्या कामगिरीबद्दल रात्रभर विचार करूनही मला या परिवर्तनाच कोड उलगडलंं नाही.मी इथल्या मातीकडंं पहिलंं.ती आमच्या पवित्र गंगा नदीच्या खोऱ्यातील मातीइतकी सुपीक निश्चितच नाही. इथलं हवामान थंडीत खूपच थंड आणि उन्हाळ्यात उष्ण असतंं,पण भारतात सर्वत्र हीच परिस्थिती आहे.इथंं पाऊस ३० इंच पडतो. भारतात इतरत्रही साधारण इतकाच पाऊस पडतो. निदान इथली जमीन गवताळ असेल आणि गायी-म्हशी खुशीनं दिवसभर हिरवंगार गवत चरत असतील असं मला वाटल होतं. पण बाकीच्या भारताप्रमाणं इथंही केवळ पावसाळ्यातच हिरवळ असते. या भागातील म्हशी चांगल्या धष्टपुष्ट आहेत म्हणावे तर तसंही नाही. आपण रागावू नका, पण लहानपणी मी माझ्या घरी यापेक्षा चांगल्या म्हशी पाहिल्या आहेत. शेतकरी नेहमीच चांगला असतो. इथलाही तसाच आहे, पण तो पंजाबी शेतकऱ्यांंइतका कष्टाळू नाही आणि असं

अदभुत दुनिया व्यवस्थापनाची/१५७