पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/१६४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

व्यवस्थापन शैलीवर परिणाम
 आधुनिक काळातील उद्योग आणि व्यवसायांच्या व्यवस्थापन शैलीवरही या स्वभावाचा परिणाम झालेला आहे. पारंपरिक भारतीय खासगी उद्योगांचं व्यवस्थापन पाश्चात्य चर्च व सैन्य संस्कृतीप्रमाणे न चालता भारतीय मंदिरं आणि सैन्य संस्कृतीप्रमाणं चालतं. या व्यवस्थापनाचे तीन पैलू आहेत.
 १) क्षमतेपेक्षा वय व वरिष्ठतेला महत्व.
 २) अधिकार व जबाबदारी यांची विभागणी योग्य नसल्याने निर्माण होणारा गोंधळ व गैरसमज.
 ३) कामावरील निष्ठेपेक्षा व्यक्तिनिष्ठेला प्राधान्य.
 आधुनिक काळात भारतीयांनी पाश्चात्यांचे व्यवसाय व उद्योग स्वीकारले, पण त्यांची व्यवस्थापन पध्दती स्वीकारली नाही .त्यामुळे त्यांच्याप्रमाणे आपण जगभरात आपल्या उद्योगाचं साम्राज्य स्थापन करू शकलो नाही.
तीन तर्हेची व्यवस्थापनं :
 भारतीय उद्योगांमध्ये सध्या तीन प्रकारच्या व्यवस्थापन पध्दती दिसून येतात .एक खासगी उद्योगाचं नियंत्रण मुख्यत एका कुटुंबाच्या हातात असतं, त्यांची कार्यपध्दती भारतीय संस्कृतीप्रमाणे असते. मात्र , त्यांनी नेमलेले व्यवस्थापक पाश्चात्य पध्दतीचं शिक्षण घेतलेले असतात. त्यामुळे मालक आणि व्यवस्थापक यांच्यात अनेकदा वैचारिक व तात्विक संघर्ष निर्माण होऊन विकासाची गती मंदावते.
 दोन ,अनेक विदेशी कंपन्यांनी त्यांच्या उपशाखा (सबसिडिअरीज) येथे स्थापन केलेल्या आहेत. त्यांचं व्यवस्थापन पूर्णपणे पाश्चात्य पध्दतीने म्हणजेच चर्च संस्कृतीप्रमाणं चालतंं.
 तीन,या दोन्ही पध्दतींमधील नकारात्मक बाबी सार्वजनिक (सरकारी) उद्योगांच्या व्यवस्थापनात दिसून येतात .या उद्योगांचं व्यवस्थापन पााश्चयात्य पध्दतीने चालविण्याची भाषा एकीकडे केली जाते, पण प्रत्यक्षात व्यक्तिनिष्ठा, राजकीय हस्तक्षेप इत्यादी खास भारतीय गुणधर्माचाच त्यात वावर असतो.

 भारतीय व्यवस्थापनाची तीन तोंड अशी तीन दिशांना आहेत. त्यामुळं उद्योग क्षेत्रात असमतोल व गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. उद्योग पाश्चात्यांचे पण व्यवस्थापन शैली भारतीय, यामुळे जनसामान्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यास भारतीय उद्योग असमर्थ ठरत आहेत. त्यांच्या मालाचा दर्जा पाश्चात्यांच्या तुलनेत कमी पडत आहेे. साहजिकच सर्वसामान्य लोकांना वाटणारंं बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या उत्पादनाचं आकर्षण वाढत आहे. याचाच फायदा घेऊन त्या कंपन्या आपलं जाळे इथं पसरवत

अदभुत दुनिया व्यवस्थापनाची/१५५