पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/१६३

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


व्यवस्था मजबूत बनली. त्यामुळे समाजाचं एकसंधत्व नाहीसं झालं .व्यापार, संपत्ती संकलन इत्यादींना भौतिक व ऐहिक बाबी ठरवून त्याचंं महत्त्व दुय्यम असल्याच समाजाच्या मनावर बिंबवले जाऊ लागलं. धर्माचं समष्टीप्रधान स्वरूप नाहीसं होऊन ताेे व्यक्तिप्रधान व आत्मकेंद्री बनला. अर्थप्राप्तीपेक्षा पुण्यप्राप्ती अधिक प्रतिष्ठेची मानली जाऊ लागली. समाजाला विचारी बनविण्यापेक्षा श्रद्धाळू बनविणं हे धर्माचार्याचं ध्येेय झालं.सर्व काही परमेश्वराच्या हातात आहे. आपण केवळ त्याच्या हातातली साधन आहोत. मानवी बुध्दी ही दुखाची जननी आहे. संपत्ती, वैभव या नश्वर बाबी आहे. त्यांच्या पाठी लागणं पाप आहे इत्यादी प्रकारचा उपदेश समाजाच्या मनात पक्का रुतून बसला. याचा परिणाम म्हणून समाजाच्या कर्तृत्वांच्या सीमांना मर्यादा पडत गेल्या.
 चर्च संस्कृतीमध्ये ज्याप्रमाणं सर्वोचं धर्मपीठापासून तळागाळातील मिशनन्यांपर्यंत एक साखळी असते तशी पध्दती भारतातील मंदिरांबाबत निर्माण झाली नाही. इतर धर्माच्या लोकांना आपल्या धर्मात आणावं, आपल्या धर्माची संख्या वाढवावी, अन्न आपल्या धर्माचार्यांना कधी वाटलं नाही. उलट, आपले जे लोक इतर धर्मात गेलेे, त्यांची परतीची वाटही या धर्मगुरूनी बंद करून टाकली. सर्व स्थळांनी व मंदिरांनी एका नेतृत्वाखाली कधीच कार्य केलं नाही. धर्म एक असला तरी प्रत्येक धर्मगुरूचे स्वतःच तत्त्वज्ञान असे आणि तो तेवढ्यापुरताच विचार करीत असे. धर्माचा विस्तार करण्यापेक्षाा आपापले सवतेसुभे सांभाळणे हेच त्यांचे ध्येय होतं.
सैन्यरचनेतही तीच पध्दत:
 ब्रिटिश सत्ता येण्यापूर्वी भारतीय राजांची सैन्यरचनाही अशीच खंडित होत. स्वतःच्या सीमा राखणंं एवढ्यापुरतेच सैन्याचं काम असे. काही वेळा परराज्यांत घुसून लूूट करण्याचे आदेश सैन्याला दिले जात. मात्र त्याचा उद्देश संपत्ती कमावणं आणि सैन्याला युध्दाचा थोडासा सराव मिळणे एवढ्यापुरताच मर्यादित असे. परकीय मुलुख आपल्या देशाला जोडावा, राज्यविस्तार करावा असा व्यापक उद्देश मुळीच नसे.

 परमुलुखांवर आक्रमण करण्यासाठी गेलेल्या सैन्याला साधनसामुग्री पुरविण्याची संपर्क यंत्रणाही विकसित झाली नव्हती. त्यामुळे राज्यविस्तार करण्याची इच्छा काही राजांंना असूनही त्यांना ते शक्य होत नसे. याबाबत पेशव्यांचे उदाहरण पाहण्यासारखंं आहे. पहिल्या तीन पेशव्यांनी मराठी साम्राज्याचा विस्तार दिल्लीपर्यंत केला. पण कालांतरानं राजधानी पुण्यापासून शेकडो कोस दूर गेलेल्या सैन्याला कुमक पाठवणंं त्यांना शक्य झाले नाही. परिणामी उत्तरेत मोहिमेवर गेलेल्या विविध सरदारांनी तेथील भिन्न भिन्न प्रदेशांवर आपली संस्थानं स्थापन केली.त्यांच्यावर पेशव्यांचे नियंत्रण नाममात्र राहीलंं.

व्यवस्थापन शैलीत बदल आवश्यक/१५४