पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/१५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अवलंबून असतं. अशा वेळी ते प्रवाहाच्या दिशेला जुमानत नाहीत. त्याचप्रमाणे ’खरा' व्यवस्थापक कंपनीचे भवितव्य व हित ज्यावेळी पणाला लागलेलं असतं, तेव्हा सर्व दबाव झुगारून अचूक निर्णय घेण्याचं सामर्थ्य दाखवतो.
 अमृतसर येथील सुवर्णमंदिर. लष्करी कारवाईनंतर काही महिन्यांनी मला तेथे जाण्याची संधी मिळाली. त्यावेळी अजूनही तेथे वातावरण तणावग्रस्त होतं. आमच्या यजमानांनी आम्हाला जालियनवाला बाग व सुवर्णमंदिर दाखवलं, ‘उद्या वाघा बॉर्डर बघावयास जाऊ’ असं ते म्हणाले. ‘सीमारेषेत पाहण्यासारखं काय खास असतं,’ असे मी विचारताच ते म्हणाले की, तेथे दररोज सायंकाळी सीमेच्या एका बाजूला भारतीय व एका बाजूला पाकिस्तानी ध्वज उतरताना सैन्य एकसारख्या पध्दतीने कवायत करतं. ती पाहण्यासारखी असते.
 यजमानांचा आग्रह मोडू नये म्हणून मी ती कवायत पाहावयास गेलो. त्यावेळी तेथे एक शिक्षिका आपल्या २० विद्यार्थ्यांना घेऊन ते दृश्य दाखविण्यास आली होती. ती विद्यार्थ्यांना सांगत होती “मुलांनो आता जेव्हा ध्वज उतरवला जाईल, त्यावेळी तुम्ही एका सुरात ‘सारे जहाँ से अच्छा, हिंदोस्ताँ हमारा' हे गाणे म्हणा."
 मला या प्रकाराविषयी उत्सुकता निर्माण झाली. मी त्या शिक्षिकेला विचारलं तेव्हा त्या म्हणाल्या, "मी दर महिन्याच्या पहिल्या तारखेला येथे मुलांना घेऊन ध्वजावतरण दाखवण्यास येते. या महिन्यात मात्र माझी बरीच अडचण झाली.” मी त्यांना विचारलं, “का बरं?” यावर त्या उत्तरल्या, ‘या महिन्यात पंजाबात शिक्षकांच्या बदल्या केल्या जातात. बदली होऊ नये असे वाटत असेल तर पैसे चारावे लागतात. ‘पे अँँण्ड स्टे' (पैसा मोजा; बदली टाळा) असं धोरण आहे. मला इथंच राहायचं होतं. त्यामुळे बराच पैसा ओतावा लागला. मी येथे ज्या मुलांना घेऊन येते. त्यातील तीन-चारांना तरी शाळेपासून इथपर्यंतचा प्रवास खर्च न झेपणारा असतो. त्यांचा खर्च मला करावा लागतो. पण या महिन्यात बदली टाळण्यासाठी पैसे द्यावे लागल्याने मुलांचा प्रवास खर्च भागवताना नाकी नऊ आले.”
 “इतका वाईट अनुभव येऊनही 'सारे जहाँ से अच्छा, हिंदोस्ताँ हमारा'हे गाणं मुलांकडून कशाला म्हणून घेता?” माझा नैसर्गिक प्रश्न.
 मग आपल्या देशात सुधारणा मुलांखेरीच कोण घडवून आणील ?" बाईंनी तडफदार प्रतिप्रश्न केला. त्या पुढे म्हणाल्या, "मला ते शक्य झालं नाही. पंतप्रधान, मुख्यमंत्री यांसारख्या अधिकारी व्यक्तींना देशाची प्रगती घडवून आणण्यास भाग पाडण्याइतका माझा प्रभाव नाही; पण माझा माझ्या विद्यार्थ्यांवर प्रभाव आहे. त्याचा उपयोग मी देशासाठी करणार आहे. विद्यार्थ्यांची माझ्यावर श्रध्दा आहे. म्हणून मी येथे

त्यांना घेऊन येते. त्यांना राष्ट्रध्वजाचे दर्शन घडवते. त्यांच्याकडून देशभक्तीपर गीत

ओंडका आणि मासा /६